मोहम्मद सिराजने इतिहास घडवला; अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच गोलंदाज
आयपीएल 2026 मध्ये पुन्हा एकदा “मियां मॅजिक” पाहायला मिळाले. गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने पंजाब किंग्सविरुद्ध नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात इतिहास रचला. कर्णधार शुबमन गिलने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि सिराजने तो योग्य ठरवला.
सिराजने पहिल्याच षटकात दोन विकेट घेत पंजाबला मोठा धक्का दिला. आयपीएलच्या इतिहासात आपल्या संघासाठी पहिल्या षटकात दोन विकेट घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला. त्याने सर्वप्रथम धोकादायक फलंदाज प्रियांश आर्यला बाद केले. डेब्यू करणाऱ्या निशांत सिंधूने शानदार डायव्ह मारत अप्रतिम झेल घेतला. त्यानंतर लगेचच कूपर कॉनॉलीलाही शून्यावर परत पाठवले. त्याचा झेल यष्टिरक्षक जोस बटलरने घेतला.
पहिल्या षटकात सर्वाधिक विकेट (आयपीएल 2026):
5 – जोफ्रा आर्चर
३ – मोहम्मद सिराज
३ – मोहम्मद शमी
3 – प्रफुल हिंगे
गुजरातच्या वेगवान गोलंदाजी तिकडीने सिराज, जेसन होल्डर आणि कगिसो रबाडा पंजाबला 163/9 धावांवर रोखले. सुरुवातीलाच मोठे नुकसान झाल्याने पंजाब 9 षटकांत 47/5 अशा संकटात सापडला. त्यानंतर शेंडगे आणि मार्कस स्टोइनिस (40) यांनी 79 धावांची भागीदारी करत डाव सावरला. शेंडगेने मनव सूथारच्या एका षटकात 26 धावा काढत झपाट्याने अर्धशतक पूर्ण केले, पण रबाडाने त्याचा डाव संपवला. शेवटी मार्को जानसनच्या फटक्यांमुळे पंजाबने 160 चा टप्पा पार केला.
164 धावांचा पाठलाग करताना सामना सोपा वाटत असला तरी पंजाबच्या गोलंदाजांनी गुजरातला अडचणीत आणले. साई सुदर्शनने अर्धशतक झळकावले, पण त्यानंतर झटपट विकेट पडल्या. शेवटच्या षटकात 11 धावांची गरज असताना सामना रंगतदार झाला. मार्कस स्टोइनिसच्या षटकातील पहिली चेंडू वाइड गेली. त्यानंतर अरशद खानने चौकार मारला. पुढील काही चेंडूंवर धावा काढल्यानंतर अखेर पाचव्या चेंडूवर वॉशिंग्टन सुंदरने षटकार ठोकत गुजरातला थरारक विजय मिळवून दिला.
Comments are closed.