अनुभवाचा करिष्मा; मुंबईच्या देसाईंवर कॅनडाने सोपवली मोठी जबाबदारी! पुरुष संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपला स्तर उंचावण्यासाठी क्रिकेट कॅनडाने प्रशिक्षक फळीत मोठे फेरबदल केले असून, मोंटी देसाई यांची पुरुष संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. कॅनडचा संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकादर कामगिरी करू शकलेला नाही. मागील काही वर्षांमध्ये कॅनडाने ICC स्पर्धांमध्ये आपला सहभाग नोंदवला आहे. मात्र, संघाची कामगिरी अत्यंत सुमार राहिली आहे. त्यामुळे कॅनडा क्रिकेट बोर्डाने मुंबईकर मोंटी देसाई यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवत त्यांच्या खांद्यावर पुरुष संघाची सुत्र सोपवली आहेत.

मोंटी देसाई यांना 20 वर्षांहून अधिक प्रशिक्षणाचा अनुभव आहे. त्यांनी यापूर्वी नेपाळ, अफगाणिस्तान आणि यूएई यांसारख्या उदयोन्मुख संघांसोबत काम केले आहे. नेपाळला एकदिवसीय क्रिकेटचा दर्जा मिळवून देण्यात आणि आयसीसीच्या प्रमुख स्पर्धांसाठी पात्र ठरवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. तसेच, आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सच्या कोचिंग स्टाफमध्येही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. आपल्या निवडीबद्दल आनंद व्यक्त करताना देसाई म्हणाले की, कॅनडाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी मिळणे हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. जागतिक स्तरावर क्रिकेट वाढवण्यासाठी असोसिएट देशांचा विकास होणे अत्यंत आवश्यक, असल्याच मत देसाई यांनी व्यक्त केलं.

IPL 2026 – विश्वचषक विजेत्या खेळाडूला सनरायझर्स हैदराबादने दिली संधी, दुखापतग्रस शिवम मावीच्या जागी मैदानात उतरणार!

अलीकडेच पार पडलेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये कॅनडाला चारही सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला होता. तसेच, संघाशी संबंधित एका सामन्याची भ्रष्टाचार विरोधी पथकाकडून (ACU) चौकशी सुरू असल्याने कॅनडा क्रिकेटच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या संकटातून संघाला बाहेर काढण्याचे मोठे आव्हान देसाईंसमोर असेल. क्रिकेट कॅनडाचे अध्यक्ष अरविंदर खोसा म्हणाले की, “व्यावसायिक क्रिकेटमध्ये कॅनडाची नवी ओळख निर्माण करणे ही आमची पहिली प्राथमिकता आहे. मोंटी देसाईंच्या अनुभवामुळे आमचा संघ योग्य दिशेने वाटचाल करेल, याची आम्हाला खात्री आहे.” असं अरविंदर खोसा म्हणाले.

Comments are closed.