खासदार संजय जाधव उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? ‘त्या’ विधानाने भुवया उंचावल्या; म्हणाले, ‘सध्याची
संजय जाधव: महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) सध्या अनेक भूकंप होत असतानाच आता परभणीचे शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) खासदार संजय जाधव यांच्या एका विधानाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे जाधव आता वेगळी वाट धरणार का? अशा चर्चांना परभणीत (Parbhani News) उधाण आले आहे.
Sanjay Jadhav: नेमकं काय म्हणाले संजय जाधव?
परभणीतील एका खाजगी रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी खासदार संजय जाधव बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या राजकीय भविष्याबाबत सूचक विधान केले. ते म्हणाले, “मी ज्यांच्यामुळे मोठा झालो त्यांचा कधीही विश्वासघात करणार नाही, पण सध्याची परिस्थिती बदललेली आहे. निवडणुकीत आर्थिक गणित महत्त्वाचं असतं, त्यामुळे पुढे काय होईल सांगता येत नाही.” जाधव यांच्या या विधानातील ‘आर्थिक गणित’ आणि ‘बदलेली परिस्थिती’ या दोन शब्दांनी सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्यांनी थेट पक्षांतराचे नाव घेतले नसले तरी, भविष्यात ते ‘परिस्थितीनुसार’ मोठा निर्णय घेऊ शकतात, असे संकेत यातून मिळत आहेत.
Sanjay Jadhav: शिंदे गट किंवा भाजपमध्ये प्रवेशाच्या चर्चा
मागील काही दिवसांपासून संजय जाधव हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना किंवा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या वावड्या उठत आहेत. या चर्चांना त्यांच्या ताज्या वक्तव्यामुळे अधिक बळ मिळाले आहे. विशेष म्हणजे, पत्रकारांनी यावर त्यांची भूमिका विचारली असता त्यांनी कॅमेरासमोर अधिक भाष्य करणे टाळले, ज्यामुळे संभ्रम अधिक वाढला आहे.
Sanjay Jadhav: परभणीत राजकीय फेरबदलाची शक्यता?
संजय जाधव यांनी अद्याप पक्ष सोडण्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, परभणीत ठाकरे गटाची मोठी ताकद असलेल्या जाधवांनी जर टोकाचा निर्णय घेतला, तर तो ‘उबाठा’ गटासाठी मोठा धक्का मानला जाईल. जिल्ह्याच्या राजकारणात सध्या जाधव ठाकरेंच्या शिवसेनेतच राहणार की शिंदे गट किंवा भाजपकडे वळणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
एकनाथ शिंदे : घरोघरी लोक आले..; मिसिंग लिंकचे उद्घाटन, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंचा टोला, फडणवीसांची भेट
आणखी वाचा
Comments are closed.