लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या हप्त्याचे पैसे आज येणार, तुमचं बँक अकाऊंट फटाफट चेक करा
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana मुंबई : महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक मदतीसाठी महायुती सरकारनं सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आजपासून दिला जाणार आहे. फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी 3500 कोटींच्या चेकवर सही केल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 15 फेब्रुवारीला दिली होती. अजित पवार यांनी पुढील आठवड्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील असं सांगितलं होतं. मात्र, आठवडा उलटून गेल्यानंतर देखील महिलांना पैसे मिळण्यास सुरुवात झाली नव्हती. यावरुन विरोधकांकडून टीका सुरु करण्यात आली. अखेर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आजपासून मिळण्यास सुरुवात होणार असल्याची महिला व बाल विकास विभागाकडून देण्यात येणार आहे.
लाडक्या बहिणींना आजपासून 1500 रुपये मिळणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये आजपासून मिळणार आहेत. जानेवारी महिन्यात 2 कोटी 41 लाख महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले होते. लाडकी बहीण योजनेतील अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरु केल्यानंतर साधारणपणे 9 लाख महिलांची संख्या कमी झाल्याची माहिती होती. त्यामुळं यावेळी जानेवारीच्या तुलनेत कमी महिलांना लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये मिळतील.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता आज पासून दिला जाणार असल्याची माहिती महिला व बाल विकास विभाग विभागानं दिली आहे. अर्थ खात्याकडून फेब्रुवारी महिन्यासाठी मिळणारी रक्कम महिला व बालकल्याण खात्याला वर्ग झाली आहे. काही तांत्रिक बाबीमुळे पैसे देण्यास उशीर झाल्याची खात्याची माहिती, देखील विभागाकडून देण्यात आली आहे.
फेब्रुवारी महिना संपायला 4 दिवस बाकी असताना अद्याप हप्त्याची रक्कम जमा होतं नसल्यामुळे सरकारवर विरोधकांकडून सरकारकडून टीका करण्यात येत होती.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 15 फेब्रुवारीला एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी 3500 कोटी रुपयांच्या चेकवर सही केली असून येत्या आठवड्यात पैसे मिळण्यास सुरुवात होतील, असं म्हटलं होतं. त्यामुळं लाडक्या बहिणींना 1500 रुपये कधी मिळणार याची प्रतीक्षा होती.
आतापर्यंत 10500 मिळाले
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत 7 हप्त्यांचे 10500 लाडक्या बहिणींना मिळाले आहेत. आता आठव्या हप्त्याचे 1500 रुपये मिळाल्यानंतर महिलांना सरकारकडून लाडक्या बहिणींना मिळालेली रक्कम 12000 पर्यंत मिळेल.
दरम्यान, महायुतीनं लाडक्या बहिणींना सत्ता पुन्हा आल्यास 2100 रुपये देण्याचं आश्वासनं दिलं होतं, ते कधी पूर्ण होणार याकडे देखील महिलांचं लक्ष लागलंय.
इतर बातम्या :
अधिक पाहा..
Comments are closed.