बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरेंच्या पॅनलचा दारुण पराभव, शशांक राव याचं पॅनल विजयी
मुंबई : बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड म्हणजेच बेस्ट पतपेढीची निवडणूक यावेळी चांगली चर्चेत राहिली. कारण ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा सुरू असताना पहिली ठाकरे बंधूंची युती बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत झाली. मात्र ही ठाकरे बंधूंची युती बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत साधा भोपळा सुद्धा फोडू शकली नाही. ठाकरे बंधूंच्या या युतीला आपला एक सुद्धा उमेदवार निवडून आणता आला नाही.तर समोर असलेल्या महायुती पुरस्कृत सहकार समृद्धी पॅनल ने 7 जागा जिंकल्या. मात्र खऱ्या अर्थानं जर कोणी किंगमेकर ठरलं असेल तर ते बेस्ट वर्कर्स युनियन शरद राव पॅनल. शरद राव पॅनलने 21 पैकी 14 जागा जिंकत आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं.
ठाकरे बंधूंनी मराठी भाषेच्या मुद्द्यावर मेळावा घेतला आणि त्यानंतर ठाकरे बंधूंच्या युतीचे वातावरण महाराष्ट्रात तयार झालं. आगामी महापालिका निवडणुकांसाठी ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली आणि याच दरम्यान बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्रित निवडणूक लढण्यासाठी रिंगणात उतरले. ठाकरेंच्या शिवसेनेची बेस्ट कामगार सेनेचे 19 आणि मनसे बेस्ट कामगार कर्मचारी संघटनेचे दोन असे 21 उमेदवारांचं उत्कर्ष पॅनल तयार करण्यात आलं. मागील नऊ वर्ष सत्तेत असलेल्या शिवसेनेला यावेळी मनसेची साथ मिळाल्यानंतर आपण पुन्हा एकदा बाजी मारणार हा आत्मविश्वास निर्माण झाला मात्र प्रत्यक्षात निवडणुकीच्या निकालात काही वेगळच घडलं
बेस्ट पतपेढीच्या निकालात नेमकं काय झालं ?
बेस्ट पतपेढीच्या निकालात 21 उमेदवारांचा पॅनल होतं. यामध्ये ठाकरे बंधूंच्या पक्षांच्या कामगार सेनांची युती असलेलं उत्कर्ष पॅनल होतं. बेस्ट कामगार सेना ( ठाकरेंची शिवसेना संघटना) यांचे 19 तर मनसे बेस्ट कामगार कर्मचारी सेना ( मनसे संघटना) यांचे 2 उमेदवार रिंगणात होते.
सहकार समृद्धी पॅनलमध्ये एकूण 21 उमेदवार होते. यामध्ये श्रमिक उत्कर्ष सभा ( भाजप प्रणित संघटना ) यांचे 8, समर्थ बेस्ट कामगार संघटना ( नितेश राणे यांची भाजप प्रणित संघटना ) यांचे 5,राष्ट्रीय कर्मचारी सेना ( शिंदे शिवसेना प्रणित संघटना ) यांचे 4, एससी एसटी वेल्फेअर असोसिएशन यांचे 3 आणि दि इलेक्ट्रिक यूनियनचा एक उमेदवार रिंगणात होता. दि बेस्ट वर्कर्स युनियन पुरस्कृत शशांक राव पॅनल कडून 21 उमेदवार उभे होते. शरद राव पॅनलने 21 पैकी 14 जागा जिंकल्या तर प्रसाद लाड यांच्या पॅनलनं 7 जागांवर विजय मिळवला.
खरंतर ठाकरे बंधूंचे उत्कर्ष पॅनल जिंकणार की मग महायुती पुरस्कृत सहकार समृद्धी पॅनल जिंकणार यामध्ये लढतीची चर्चा असताना मात्र निकालात शशांक राव पॅनलने बाजी मारली. बेस्ट वर्कर्स यूनियन शशांक राव पॅनलचे 14 उमेदवार विजयी झाले. सहकार समृद्धी पॅनलचे सात उमेदवार विजयी झाले. यामध्ये भाजप पुरस्कृत श्रमिक उत्कर्ष सभेचे 4 उमेदवार विजयी झाले. शिंदेंची शिवसेना पुरस्कृत राष्ट्रीय कर्मचारी सेना 2 उमेदवार तर एससी एसटी वेल्फेअर युनियनचा 1 उमेदवार विजयी झाला.
बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या निकालावर कोण काय म्हटलं?
ठाकरे बंधूंचं उत्कर्ष पॅनल 21 पैकी एकही उमेदवार निवडून आणू शकलं नाही. तर मागील नऊ वर्ष ठाकरेंच्या शिवसेनेचे वर्चस्व या बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत होतं ज्यामध्ये 21 पैकी 21 जागा या शिवसेनेने जिंकल्या होत्या. पराभव झाल्यानंतर बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी आम्ही पैशात कमी पडल्याचं प्रतिक्रिया त्यांनी म्हटलं .
शशांक राव यांनी 2024 मध्ये भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. मात्र आपण जरी भाजपमध्ये असलो तरी संघटना मात्र कुठल्याही पक्ष सोबत नाही असं त्यांनी स्पष्ट केलं… मात्र या संघटनेच्या विजयामध्ये कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी भाजपने मदत केल्याचेही त्यांनी कबूल केलं.
संजय राऊत यांनी पराभवावरती भाष्य करताना म्हटलं की, तिथे कोणती युनियन मजबूत त्यावर हे अवलंबून. ठाकरे ब्रँड कधीही संपणार नाही. स्थानिक स्तरावरील छोटी निवडणूक आहे, मला यावर तुम्ही दिल्लीत विचारत आहात, असंही यावेळी राऊतांनी म्हटलं आहे.
ठाकरे ब्रँडचा पुरा धुवा उडवला आणि त्यांचा करेक्ट कार्यक्रम माझ्या माध्यमातून केला गेला आणि ठाकरे ब्रँडला शून्य जागा मिळाल्या, याचा मला जास्त आनंद आहे, असं प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे.
बेस्ट निवडणुकीत बॅलेटवर मतदान झालंय. कैवारी फक्त आम्ही असं बोलणारे आता कोणत्या बिळात लपले आहेत. आज हिंदू समाजाला समजलंय, ठाकरे ब्रँडचे काही घेणे देणे नाही. आम्ही पहिल्यादिवसापासून बोलतोय मराठी माणूस आमच्या बाजूला आहे. आम्ही काय पाकिस्तानातून आलो होतो का? असं मंत्री नितेश राणे म्हणाले.
मनसेच्या संदीप देशपांडे यांनी या पैशाचा वापर निश्चित झाला असं म्हटलं. पराभव झाला हे आरोप केले तरी टीका केली जाते.पैशांचा वापर झाला हे मी निवडणूकीपूर्वीच पुराव्यानिशी दाखवलं आहे.मनसेने पहिल्यांदा पतपेढीची निवडणूक लढवली आम्ही चांगली फाईट दिली, असं संदीप देशपांडे म्हणाले.
बेस्ट वर्कर्स युनियनच्या शशांक राव यांनी आपल्या विजयाचं रहस्य पत्रकार परिषदेत सांगितलं.बेस्ट कर्मचाऱ्यांचा ग्रॅज्युएटीचा विषय, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगाराचा विषय ,बेस्टचे खाजगीकरण, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडवण्याचं काम आमच्या संघटनेने केलं आणि त्यामुळेच बेस्ट कर्मचाऱ्यांनी आम्हाला ही पोहोचपावती दिल्याचं त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं मात्र हे सांगत असताना त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार या भाजपने त्यांचे सुद्धा आभार मानले.
ठाकरे बँड टिकवण्यासाठी दोन्ही पक्षांना धडा
ठाकरे बंधू, ठाकरे ब्रँड म्हणत या निवडणुकीच्या रिंगणात मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र लढली. मात्र आपली ताकद ही निवडणूक सहज जिंकवेल हा भ्रमाचा भोपळा बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत फुटला.त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांसाठी ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर ठाकरे ब्रँड हा महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ब्रँड ठेवायचा असेल तर या निवडणुकीतून दोन्ही पक्षांना शिकावं लागणार आहे.
https://www.youtube.com/watch?v=cokko8ixtni
आणखी वाचा
Comments are closed.