मानखुर्दच्या अनुज कुमारचा हरियाणात डंका, बॉक्सिंग रिंगणात मिळवला दमदार विजय

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबईतील मानखुर्दच्या ज्योतिर्लिंग नगरमधील बॉक्सर अनुज कुमार याने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. हरियाणा येथे आयोजित करण्यात आलेल्या बॉक्सिंग स्पर्धेत अनुजने प्रतिस्पर्ध्याला धूळ चारत दमदार विजय संपादन केला.

या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीतील १५ व्या बाउटमध्ये अनुज कुमार रेड कॉर्नरमधून मैदानात उतरला होता. सामन्याच्या सुरुवातीपासूनच त्याने अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. प्रतिस्पर्धी खेळाडूला सावरण्याची कोणतीही संधी न देता अनुजने आपल्या पंचांच्या जोरावर मैदानावर वर्चस्व गाजवले.

याआधीही अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील बॉक्सर्सना पराभूत करण्याचा पराक्रम अनुजने केला आहे. त्याच्या या यशामुळे मानखुर्द परिसरात आणि क्रीडा वर्तुळात त्याचे कौतुक होत आहे. या विजयामुळे पुन्हा एकदा मुंबईच्या एका गुणी खेळाडूने राज्याबाहेर आपल्या कौशल्याचा ठसा उमटवला आहे.

Comments are closed.