IPL 2026 – मिचेल स्टार्क आला अन् दिल्लीने राजस्थानला पाजलं पराभवाची पाणी; निसांका-राहुलची धडाकेबाज फलंदाजी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

IPL 2026 मध्ये सलग तीन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना केल्यानंतर अखेर दिल्ली कॅपिटल्सने बलाढ्य आणि तुफान फॉर्मात असलेल्या राजस्थानचा 7 विकेटने पराभव केला आहे. राजस्थानने दिल्लीला जिंकण्यासाठी 225 धावा करत 226 धावांचे आव्हान दिले होते. रियान पराग (90), ध्रुव जुरेल (42) आणि फरेरा (47*) यांच्या धमाकेदार फलंदाजीमुळे राजस्थानने 6 गड्यांच्या मोबदल्यात 226 धावांपर्यंत मजल मारली. या हंगामातील पहिल्याच सामन्यात खेळताना मिचेल स्टार्कने आपल्या धारधार गोलंदाजीने राजस्थानला तीन मोठे हादरे देत चाहत्यांची मन जिंकली. प्रत्युत्तरात दिल्लीने रुबाबात सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी 110 धावांची भागीदारी केएल राहुल आणि निसांका यांनी. दोघांनी मिळून गोलंदाजांना चोपून काढलं. निसांकाने 62 आणि राहुलने 75 धावांची सलामी दिली. त्यानंतर आलेल्या नितेश राणानेही आपले हात मोकळे करत 17 चेंडूंमध्ये 33 धावा केल्या. अखेर अशुतोष शर्माने 15 चेंडूंमध्ये 4 चौकार मारत नाबाद 25 धावा करत संघाचा विजय निश्चित केला.

Comments are closed.