मुंबईत बालकांच्या मज्जा संस्थेच्या विकासासंदर्भात सेवा केंद्र सुरू करा, शिवसेनेची पालिकेकडे मागणी
मुंबईत लहान मुलांच्या मज्जा संस्थेच्या विकासासंदर्भात एक केंद्र उभारण्याची मागणी प्रभाग क्र. 54चे शिवसेनेचे नगरसेवक अंकित प्रभू यांनी महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.
सध्या लहान मुलांमध्ये शारीरिक व मानसिक दुर्बलतेचे प्रमाण वाढत आहे. मुलांना व त्यांच्या पालकांना यातून बाहेर काढण्यासाठी मुंबई महापालिकेने एक केंद्र निर्माण करून लहान मुलांच्या आजारावर मात करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. स्वतंत्र केंद्रामुळे मुलांना सकारात्मक बदल घडवून येईल व समाजात त्यांना बघण्याचा दृष्टिकोन व मानसिकता बदलेल अशी आशा अंकित प्रभू यांनी व्यक्त केली आहे.
मुंबई महानगरपालिकेने त्वरित आधार केंद्र उभे करून या मुलांवर त्वरित उपचार करावेत. त्याचबरोबर भायखळा येथे अशा प्रकारचे केंद्र असून तेथे जास्त प्रमाणात उपचार घेत असल्याने जागा अपुरी पडत आहे. यासाठी आपला दवाखाना येथे अशी उपचार केंद्रे उभी करावीत जेणेकरून जास्तीत जास्त मुलांना या सेवेचा फायदा मिळेल, असे अंकित प्रभू यांनी पत्रात नमूद केले आहे.
Comments are closed.