मुंबईत 60 वर्षीय पतीने 53 वर्षीय पत्नीवर झाडल्या गोळ्या; बंदुकीतून गोळी झाडून स्वत: संपवले जीवन

मुंबई : भांडवल मुंबबी) गुन्हेगारीच्या घटना सातत्याने घडतात, त्यामध्ये गुंडगिरी, अंडरवर्ल्ड व आर्थिक देवाण-घेवाणीतून घटना घडत असतात. तर, अनेक कौटुंबिक कलहातूनही हत्यासारखे गंभीर गुन्ह घडल्याचं समोर येतं. आता, मुंबईतील वरळी भागात आज सकाळी एका 60 वर्षीय पतीने आपल्या पत्नीची देशी बनावटीच्या बंदुकीने गोळी झाडून हत्या केली. त्यानंतर, त्याच बंदुकीने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीने हत्या केलेल्या पत्नीचे वय 53 वर्षे होते. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली या हत्याकांडाचे नेमकं कारण अद्याप समोर आले नसून पोलीस तपास सुरू आहे. पत्नीची हत्या करणाऱ्या पतीकडे नेमकं पिस्तूल कुठून आले, याचा तपास पोलिसांकडून (police) सुरू आहे.

वरळी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला करत तपास सुरू केला आहे. तसेच, पोलिसांनी घटनास्थळावरून बंदूक जप्त केली असून दोन्ही मृतदेह शवविच्छेनासाठी सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.

अंधेरी भागात ड्रोन उडवणाऱ्या तिघांना अटक

मुंबईच्या अंधेरी पूर्वेत एमआयडीसी परिसरात विनापरवाना ड्रोन कॅमेरा उडवणाऱ्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाशात चित्रित करणाऱ्या ड्रोन कॅमेऱ्यालाही जप्त केलं आहे. मुंबई पोलीस आयुक्त बृहन्मुंबई शहर यांच्याकडून मुंबई शहरात सुरक्षेच्या दृष्टीने ड्रोन कॅमेरा उडवण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. पोलिसांकडून ड्रोन कॅमेरा मनाई असताना देखील अंधेरी पूर्वेत एमआयडीसी परिसरात Seepz कंपनीच्या समोर ड्रोन कॅमेरा द्वारे कोणत्याही परवानगी शिवाय आकाशात ड्रोनद्वारे चित्रीकरण करताना आढळून आले.

एलिगंट डेव्हलपर्स, यांचे ऍडव्हरटाईस व्हिडिओ क्लिप बनवण्याकरिता ह्या ड्रोन कॅमेराचा वापर करण्यात आला होता. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी 3 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून ड्रोन कॅमेरा जप्त केली आहे. अटक आरोपीचे नाव अर्शदअब्दुल समी अन्सारी  (वय 27), स्वप्निल प्रकाश देसाई (वय 32), सोनू कुमार चंद्रसिंग रॉय (वय 26) असून हे सर्व आरोपी भाईंदर परिसरामध्ये राहणारे आहेत. हे सर्व आरोपी आपसात संगणमत करून विना परवाना ड्रोन कॅमेराद्वारे एमआयडीसी परिसरात चित्रित करत होते. दरम्यान, याप्रकरणी सध्या एमआयडीसी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

हेही वाचा

मी कधीही नापास होऊ शकत नाही, आजही मला उद्धव ठाकरेंचे फोन येतात; संजय राठोडांचा खळबळजनक दावा

आणखी वाचा

Comments are closed.