Mumbai : गोरेगाव नेस्को सेंटर पार्टी प्रकरणाची व्याप्ती वाढली, कॉन्सर्टमधील सुरक्षारक्षकाला अटक
मुंबई गुन्हे: मुंबईतील गोरेगाव नेस्को संकुलातील (Goregaon Nesco Centre case) लाइव म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोसने 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणाच्या तपासात आता धक्कादायक माहिती समोर येत असून या प्रकरणाची व्याप्ती अधिक वाढल्याचे चित्र आहे. नेस्को, गोरेगाव येथील पार्टीत ड्रग्सचा प्रकरणात आणखी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. नेस्को येथील ड्रग्स प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी आणखी एक संशयित आरोपीला अटक केली आहे. कॉन्सर्टमधील एका सुरक्षारक्षकाला पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली. हा सुरक्षारक्षक नेस्कोचा कर्मचारी नसून थर्ड पार्टी इव्हेंट आयोजकाकडून नियुक्त करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
Mumbai Crime : तपासाचा फोकस आता सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटी आणि कॉन्सर्ट प्रवेश प्रक्रियेतील गैरव्यवहारांकडे
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, याच सुरक्षारक्षकाच्या मदतीने आयुष्य साहित्य याने विना तिकीट कॉन्सर्टमध्ये प्रवेश केल्याचा आरोप आहे. त्यासाठी सुरक्षारक्षकाला हजार ते दीड हजार रुपयांची लाच दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांनी सुरक्षारक्षकाचा शोध घेतला असून आधी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली. या अटकेमुळे नेस्को ड्रग्स प्रकरणातील तपासाचा फोकस आता सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटी आणि कॉन्सर्ट प्रवेश प्रक्रियेतील गैरव्यवहारांकडे वळण्याची शक्यता आहे.
मुंबई गुन्हे प्रकरण: नेस्को सेंटरमधील प्रकरणानंतर मुंबई पोलिसांकडून नवीन नियमावली जारी
दोनसरीकडे, गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये ड्रग्स पार्टीचा घटनेनंतर मुंबई पोलिसांकडून नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे. 2000 पेक्षा जास्त लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये गर्दी होत असेल तर मुंबई पोलिसांचे तीन पथक त्या ठिकाणी नेमणूक करण्यात येणार आहे. गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये ड्रग्स पार्टीमध्ये ड्रग्सच्या ओव्हर डोज घेतल्यामुळे दोन विद्यार्थ्यांच्या दुर्दैवी मृत्यू झाला होयता. यानंतर मुंबई शहरात होणारा लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टसाठी मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आल्याचे बघायला मिळत आहे. लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टसाठी मुंबई पोलिसांची विशेष तयारी आणि नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे. यापुढे दोन हजार पेक्षा जास्त नागरिकांचा म्युझिक कॉन्सर्ट-शो असेल तर मुंबई पोलिसांकडून त्या म्युझिक कॉन्सर्टला तीन पथकांच्या नेमणूक करण्यात येणार आहे. या म्युझिक कॉन्सर्टमध्ये मुंबई पोलिसांचा अमली पदार्थ प्रतिबंधक पथक (anti drug squad), छेडछाड प्रतिबंधक पथक(Anti Eve testing squad), चोरी प्रतिबंधक पथक(anti theft squad) अशा तीन पथकांचे नेमणूक करण्यात येणार आहे.
Mumbai Police : नियमांचा भंग केला तर मुंबई पोलिसांकडून कठोर कारवाई
दरम्यानया प्रत्येक पथकामध्ये एक अधिकारी चार अंमलदार असा पाच जणांचा नेमणूक असणार आहे. त्यासोबत इव्हेंट ऑर्गनायझरकडून इव्हेंटचा पास पोलिसांच्या एनओसी भेटल्यानंतरच ऑनलाईन आणि ऑफलाईन विकता येणार आहे. या नियमांचा जर कुठलाही इव्हेंट ऑर्गनायझर भंग केला तर त्याच्यावर मुंबई पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाणार असल्याचे इशारा देण्यात आला आहे.
आणखी वाचा
Comments are closed.