महिला क्रिकेटरने मुंबईतील उद्योगपतीला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवलं, 63 लाख उकळले, पोलिसांकडून

मुंबई क्राईम न्यूज: मुंबईतील एका उद्योगपतीला महिला क्रिकेटरने सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवल्याचा प्रकार समोर आला आहे. या महिला क्रिकेटपटूने या उद्योगपतीकडून (Businessman) तब्बल 63 लाख रुपये उकळले. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) गुन्हे शाखेने संबंधित महिला क्रिकेटर आणि तिच्या भावासह आणखी एकाला अटक केली आहे. या महिला क्रिकेटरचे (Cricketer) नाव फारखांदा खान असून ती जम्मू-काश्मीरची (Jammu Kashmir) असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी फारखांदा खान, तिचा भाऊ बाझिल अझीझ खान आणि त्यांचा साथीदार उद्दीन वाणी यांना अटक केली आहे. फरखांदा खान ही जम्मू काश्मीरची राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आहे. ती महिला टी-20 लगीमध्येही सहभागी झाली होती. (Maharashtra Crime news)

प्राथमिक माहितीनुसार, फारखांदा आणि तिच्या भावाला दिल्लीतील एका हॉटेलमधून तर  साथीदार इम्तियाज वाणी याला श्रीनगर येथून अटक करण्यात आली आहे. दक्षिण मुंबईतील (South Mumbai) कुलाब्याचा रहिवासी असलेला 28 वर्षीय व्यावसायिक  2024मध्ये काही काळ पश्चिम उपनगरात वास्तव्याला होता. त्यावेळी तो फारखांदा हिच्या संपर्कात आला होता. कालांतराने दोघांमध्ये जवळीक वाढली होती. 2024 मध्ये फारखांदाने व्यवसायिकाकडून पैश्यांची मागणी केली असता व्यावसायिकाने पैसे देण्यास नकार दिला तेव्हा फारखांदाने त्याला धमकावण्यास सुरुवात केली. (Mumbai Latest news)

पैसे न दिल्यास दोघांचे मोबाईलवरील चॅट्स सार्वजनिक करण्याची धमकी देऊन फारखांदा हिने पैसे उकळण्याचा आरोप या तरुण उद्योगपतीने केला. सुरुवातीला व्यवसायिकाने 23 लाख आणि त्यानंतर तब्बल 40 लाख दिल्याचे मुंबई पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे. एप्रिल २०२४ पासून व्यावसायिकाकडून पैसे उकळणे सुरू असल्याची माहिती आहे. फरखांदा खान हिने या उद्योगपतीकडून घेतलेले काही पैसे इम्तियाज वाणी याच्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आले आहेत. काही पैसे वडील आणि भावाच्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आले. फरखांदा हिचा भाऊ बाझिल हादेखील संबंधित उद्योगपतीला सातत्याने धमकावत होता. तुला जेलमध्ये पाठवेन, अशी धमकी देत होता. या सगळ्यांनी उद्योगपतीला कसे जाळ्यात अडकवले, याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलीस अजूनही फारखांदा, तिचा भाऊ आणि साथीदाराची चौकशी करत आहेत. या चौकशीतून आणखी काय समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

आणखी वाचा

विवस्त्र व्हिडीओ कॉल करते, 20 हजार दे; प्रसिद्ध अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे ‘नको ते चॅट्स’ व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ

आणखी वाचा

Comments are closed.