भांडणाचा राग मनात ठेवत झोपेतच दगड घालून संपवलं, रक्तबंबाळ पाहून परिसर हादरला, मुंबईतील घटना
मुंबई गुन्हा: मुंबईतील डोंगरीच्या शालीमार हॉटेलजवळ धक्कादायक घटना घडली आहे . दोन दिवसांपूर्वी झालेल्या टोकाच्या भांडणाचा राग मनात ठेवून जूमराती मोहम्मद शेख या इसमाची झोपेत डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली आहे . पूर्ववैमनस्यातून शंकर सोनवणे उर्फ दामू याने ही हत्या केल्याने याप्रकरणी जे जे मार्ग पोलीस ठाण्यात शंकर सोनवणे विरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे . ( Mumbai Crime) या प्रकरणाचा जे जे मार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत . (Murder Case)
पूर्ववैमानस्यातून दगड घालून हत्या
मुंबईतील डोंगरी परिसरात दोन दिवसांपूर्वी शंकर सोनवणे आणि जुमराती शेख यांच्यात टोकाचे भांडण झाले होते .या भांडणाचा राग मनात ठेवून शंकर सोनवणे या इसमाने जूमराती झोपलेला असताना त्याच्या डोक्यात दगड घालून त्याची निर्घृण हत्या केली . डोंगरी परिसरातील शालीमार हॉटेल जवळ ही घटना घडल्याचं जे जे पोलिसांनी सांगितले . रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह पाहून नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली . घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले . त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन घटनेचा पुढील तपास सुरू केला असून शंकर सोनवणेला अटक करण्यात आली आहे .या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मोठी खळबळ उडाली आहे . घटनेचा पुढील तपास सुरु असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.
पुण्यात वाहनांची तोडफोड
पुणे शहर परिसरामध्ये पुन्हा एकदा हातात धारदार शस्त्र घेऊन दहशत माजवल्याचा आणि गाड्यांची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं, पोलिसांनी या प्रकरणी तिघांना ताब्यात घेतलं आहे. तर पोलिसांनी त्यांची भीती कमी करण्यासाठी या आरोपींना त्या परिसरात नेऊन त्यांची वरात काढली आहे. पुण्यात बिबवेवाडी परिसरात वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी तीन तरुणांना अटक केली आहे. वेल्हे तालुक्यातील पाबे गावातून या तिघांना अटक (Pune Crime News) करण्यात आली. कुठले ही कारण नसताना भागात दहशत निर्माण व्हावी या उद्देशाने या तिघांनी मोठ्या प्रमाणावर गाड्यांची धारधार शस्त्राने तोडफोड केली, असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुण्यातील बिबवेवाडी भागातील अपर इंदिरानगर, दुर्गामाता गार्डन, आई माता मंदिर, अप्पर डेपो, सोळा एकर, सुवर्ण मित्र मंडळ, राजीव गांधी नगर, तय्यबा मस्जिद मेन रोड परिसरातील अनेक चारचाकी, दुचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.
हेही वाचा:
अधिक पाहा..
Comments are closed.