फजल म्हणाला, तू एक दिवस फ्रिजमध्ये सापडशील, मुंबईच्या डॉ. स्तुती सोनावणेचा छळाला कंटाळून टोकाचा

मुंबई गुन्हे: मुंबईत एका तरुणीने आपल्या प्रियकराच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. 8 मार्च रोजी या तरुणीने गळफास लावून आत्महत्या (Suicide News) केली होती. ही तरुणी डॉक्टर (Doctor) असून तिचे नाव स्तुती बजरंग सोनावणे असे होते. मुंबईतील अँटॉप हिल पोलीस ठाणे यांनी डॉ. स्तुती बजरंग सोनावणे (Stuti Sonawane) यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फजल मोहम्मद खान (31) याला लोअर परळ (Lower Parel) येथून अटक केली. न्यायालयाने फजल मोहम्मद खान याला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या चौकशीतून आता कोणती नवीन माहिती समोर येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Mumbai Crime News)

डॉ. स्तुती सोनावणे यांच्या आत्महत्येमुळे मुंबई (Mumbai News) परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांना घटनास्थळावरून सहा पानांची सुसाईड नोट सापडली असून त्यात फैजल मोहम्मद खानकडून सतत मानसिक छळ होत असल्याचा उल्लेख आहे. फजलच्या छळाची माहिती स्तुतीने आपल्या मैत्रिणीला दिली होती. त्यात तिने “तू एक दिवस फ्रिज मध्ये सापडशील” असे वारंवार म्हणायचा, असे सांगितले होते. स्तुती सोनावणे आणि फजल खान यांची ओळक एका डेटिंग अ‍ॅपवरुन झाली. त्यानंतर ते गेल्या वर्षभरापासून रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, या दोघांमध्ये भांडणे व्हायची. त्यावेळी फजल खान तिला मारुन टाकण्याची धमकी द्यायचा, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

या सगळ्या त्रासाला कंटाळून डॉ. स्तुती सोनावणे यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 8 मार्च रोजी स्तुतीचे आई-वडील जेवण्यासाठी बाहेर गेले होते. हे दोघे घरी परत आल्यावर स्तुती तिच्या खोलीचा दरवाजा उघडत नव्हती. त्यावेळी स्तुतीच्या वडिलांनी खोलीचा दरवाजा तोडला असता स्तुतीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करुन स्तुती सोनावणे हिचा मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदन अहवालानुसार डॉ. स्तुती यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी अँटॉप हिल पोलिस अधिक तपास करत आहेत. या तपासातून आता कोणती नवीन माहिती समोर येणार, हे बघावे लागेल.

आणखी वाचा

तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी

डॉ. मनीषा जेजुरकरांनी आयुष्य संपवलं, भावाकडून मनोविकारतज्ज्ञ निलेश जेजुरकरांवर गंभीर आरोप , म्हणाला, ‘चर्चेसाठी बोलावलं पण…’

आणखी वाचा

Comments are closed.