मुंबईच्या काळाचौकीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, व्हिडीओ शूट करुन ब्लॅकमेलिंग अन् दररोज…

मुंबई गँग बलात्कार प्रकरण: देशाची आर्थिक राजधानी आणि भारतातील सुरक्षित शहरांपैकी एक अशी ओळख असलेल्या मुंबईत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका अल्पवयीन मुलीवर पाच जणांना मिळून सामूहिक अत्याचार (Gang Rape) केल्याचा प्रकार समोर आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, दक्षिण मुंबईतील काळाचौकी परिसरात ही घटना घडली. या मुलीचे अश्लील व्हिडीओ चित्रीत करण्यात आले होते. हे व्हिडीओ दाखवून या अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करण्यात आले. या ब्लॅकमेलिंगला बळी पडल्यामुळे पाच जणांनी या मुलीवर सामूहिक अत्याचार केले. धक्कादायक गोष्ट म्हणजे अत्याचार करणारी पाचही मुले ही अल्पवयीन आहेत. या घटनेमुळे काळाचौकी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Mumbai Crime News)

काळाचौकी पोलिसांनी मुलीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या पाचही जणांना ताब्यात घेतले आहे. या सगळ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून या मुलीवर अत्याचार सुरु होते. सततच्या या अत्याचाराला कंटाळून अखेर मुलीने तिच्या कुटुंबीयांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीना ताब्यात घेतले. ही पाच मुलं कोण आहेत, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. ही घटना उघडकीस आल्यानंतर काळाचौकी परिसरात संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे आता पोलीस याप्रकरणात काय कारवाई करतात, हे बघावे लागेल.

Beed Rape Case: बीडच्या परळीत परप्रांतीय तरुणीवर सामूहिक बलात्कार

बीडच्या परळी तालुक्यातील अस्वलांबा गावाच्या शिवारात तिघा नराधमांनी एका परप्रांतीय तरुणीवर सामूहिक अत्याचार (Rape News) केल्याची घटना शनिवारी पहाटे घडली आहे. या प्रकरणात चौघांविरोधात अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. 20 वर्षांची एक परप्रांतीय तरुणी रेल्वेने मुंबईवरुन हैदराबादकडे जाणार होती. परळी स्टेशनवर उतरुन ती एका हॉटेलमध्ये जेवत असताना तृतीयपंथी पूजा गुट्टे हिची तिच्यावर नजर पडली. पूजा हिने तिच्याशी संवाद साधत तिची गरज जाणून घेतली आणि काम देण्याचे आश्वासन दिले. यानंतर पूजा हिने सतीश मुंडे व मोहसीन पठाण यांना बोलावून घेतले.

यानंतर ते तिघे पीडित मुलीला मोटरसायकलवर बसून अस्वलंबा येथील भागवत कांदे याच्याकडे गेले. त्या ठिकाणी या तिघांनी या परप्रांतीय तरुणीवर अत्याचार केला. या प्रकरणात डायल 112 ला एका नागरिकाने फोन करत घटनेची माहिती देताच पोलिसांनी या प्रकरणात सतीश मुंडे, मोहसीन पठाण व भागवत कांदे यांना ताब्यात घेतले आहे. तर पूजा गुट्टे या तृतीयपंथीचा परळी ग्रामीण पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणात आता पुढे काय कारवाई होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

https://www.youtube.com/watch?v=tndp5sifjam

आणखी वाचा

गतिमंद मुलीला भावाने घरात घेतलं नाही, कल्याण स्थानकात नराधमाने हेरलं, चालत्या ट्रेनमध्ये शरीराचे लचके तोडले

आणखी वाचा

Comments are closed.