मुंबई विमानतळावर कस्टमची कारवाई, स्मग्लिंगचा माल पकडला, विदेशी चलन, सोनं, माणिक, ड्रग्स जप्त
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई (मुंबई) देश-विदेशातून मोठ्या संख्येने नागरिक, प्रवासी, उद्योगज आणि विविध क्षेत्रातील लोक येत असतात. त्यामध्ये, अनेकदा गुन्हेगारी आणि स्मग्लिंग करणाऱ्यांचाही समावेश असल्याचं पाहायला मिळतं. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई विमानतळावर कस्टम विभागाकडून सतर्क राहून कारवाई केली जाते. नुकतेच मुंबई विमानतळावर 24 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत कस्टम्सने (Costume) मोठी कारवाई केली असून ड्रग्ज, विदेशी चलन, हायड्रोपोनिक वीड, हिरे, सोनं असे मौल्यवान आणि अंमली पदार्थ जप्त केले आहेत. विमानतळ (Airport) आयुक्तालय, मुंबई कस्टम्स झोन–III कडून स्पॉट व APIS प्रोफाइलिंगच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.
मुंबई विमानतळातील कस्टम विभागाने वेगवेगळ्या 8 प्रकरणांत 44.292 किलो हायड्रोपोनिक वीड (NDPS) जप्त केले असून त्याचे आंतरराष्ट्रीय बाजारमूल्य अंदाजे ₹44.292 कोटी एवढे आहे. तर, बँकॉकहून आलेल्या 9 प्रवाशांना NDPS Act 1985 अंतर्गत अटक 299 ग्रॅम मेथाक्वालोन जप्त; अवैध बाजारमूल्य ₹74 लाख 75 हजार एवढी आहे. तसेच, 5 प्रकरणांत 5 प्रवाशांकडून परकीय व भारतीय चलन मिळून ₹32 लाख 85 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत.
दागिन्यांसह हिरे, माणिक, नीलम जप्त
कस्टमच्या कारवाई 455 कॅरेट नैसर्गिक व लॅब-ग्रोन हिरे जप्त करण्यात आले असून त्याची किंमत 94 लाख 97 हजार एवढी आहे. 21 कॅरेट तुटलेले सोन्याचे दागिने (160.790 ग्रॅम) जप्त केले आहेत. या दागिन्यांची बाजारभावाप्रमाणे किंमत 21 लाख 51 हजार एवढी आहे. यासह 1203.69 कॅरेट कट अँड पॉलिश्ड नैसर्गिक पाचू, माणिक, नीलम, अॅमेथिस्ट, प्रासिओलाइट व इतर रत्ने जप्त करण्यात आली आहे. बाजारभावाप्रमाणे याची किंमत 15 लाख 16 हजार एवढी आहे. याप्रकरणी, पुढील तपास मुंबई कस्टम्स विभागाकडून सुरू आहे.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.