मुंबईतील इंग्रजी माध्यमाची शाळा बंद करण्याचा निर्णय, 600 विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला
मुंबई : नव्या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेला शाळांमध्ये सुरुवात झाली असतानाच मुंबईतील (Mumbai) जोगेश्वरमधील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेनं विद्यार्थ्यांना दाखले घेऊन जाण्याचे सांगितल्याने पालकांमध्ये खळबळ उडाली आहे. शहरातील जोगेश्वरी पश्चिम परिसरात सिटी इंटरनॅशनल शाळा (School) अचानक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. शाळा प्रशासनाकडून शाळा बंद करण्यासाठी शाळेत शिकणाऱ्या 600 विद्यार्थ्यांच्या पालकांना नोटीस देण्यात आली आहे. मात्र, अचानक शाळा बंद करण्याच्या निर्णय घेतल्यामुळे शाळेत शिकणारे विद्यार्थ्यांचे पालकांमध्ये मुलांच्या भविष्याच्या काळजीने भीतीच्या वातावरण पसरले आहे. तर, मानसेन (मनसे) द्वारे. याची दखल घेत शाळेत धाव घेतली.
जोगेश्वरी येथील सिटी इंटरनॅशनल स्कूल (शाळा) बंद करण्याच्या निर्णयावर पालकांनी काळजी बाळगून मनसे नेत्यांशी संपर्क साधला असता, मनसे नेते आक्रमक झाल्याचं दिसून आलं. मनसे वर्सोवा विधानसभा विभाग अध्यक्ष संदेश देसाईंकडून शाळा बंद होऊ देणार नाही, असा म्हणत शाळा प्रशासनाला इशारा देण्यात आला आहे. ओशिवरा परिसरातील ही शाळा, सिटी इंटरनॅशनल स्कूल नावाने मागील 25 वर्षापासून सुरू आहे, येथील शाळेत 600 पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, शाळा भाडे तत्त्वावर असल्यामुळे जागा मालकाकडून महिन्याचे भाडे 35 लाख रुपयांच्या जागेवर आता 50 लाख रुपये भाडे आकारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे, या भाडेवाढीला विरोध करत शाळा प्रशासनाने चक्क शाळाच बंद करण्याचा निर्णय घेतल्याने शाळेच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.
शाळा प्रशासनाला हे भाडं परवडत नसल्यामुळे शाळा प्रशासनाने शाळा बंद करण्याचे निर्णय घेतला आहे. मात्र, अचानक शाळा बंद करण्याचे निर्णय घेतल्यामुळे पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळा बंद करण्याची माहिती मिळतच मनसेकडून शाळा प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. शाळा प्रशासनाकडून जर शाळा बंद करण्याची भूमिका ठाम राहिली आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वार्षिक नुकसान झालं तर शाळेविरोधात मनसे तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. मनसे वर्सोवा विधानसभा विभाग अध्यक्ष संदेश देसाई यांच्या शिष्टमंडळाकडून आज शाळा व्यवस्थापकांसोबत भेट घेऊन चर्चा करण्यात आली.
शिक्षण विभागाने दखल घेण्याची गरज
दरम्यान, मागील पंचवीस वर्षापासून सिटी इंटरनॅशनल स्कूल जोगेश्वरी पश्चिम ओशिवर परिसरात सुरू आहे. शाळा प्रशासनाचा या अचानक बंद करण्याचा निर्णयाच्या विरोधात पालकांनी एकवटले आहेत. त्यात, शिक्षण विभागाने दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी देखील करण्यात आली आहे.
हेही वाचा
शैक्षणिक कर्ज माहिती:
शैक्षणिक कर्ज EMI ची गणना करा
आणखी वाचा
Comments are closed.