मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मुंबई : देशाचं लक्ष लागलेल्या मुंबईबाबी). महापालिकेचा निकाल लागला अन् गुवाहाटीत गाजलेल्या काय झाडी काय डोंगर या शहाजीबापूंच्या फेमस डॉयलॉगची आठवण झाला. शहाजीबापूंची आज अचानक आठवण येण्याचं कारण म्हणजे, मुंबई महापालिकेच्या निकालानंतर मराठीni (एकनाथ शिंदे) उचलेलं पाऊल. मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन होईपर्यंत, शिवसेनेच्या नवनिर्वाचित 29 नगरसेवकांना वांद्रे येथील ताज लँड्स एन्ड या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे, एकनाथ शिंदेंना मुंबईतले शिवसेनेचे नगरसेवक फुटण्याची भीती वाटतेय का? एकनाथ शिंदेंना नेमका कुणावर भरवसा नाही? मुंबईत ठाकरेंना महापौर बसवणं शक्य होईल? यासह अनेक प्रश्नांना जन्म घातलाय तो एकनाथ शिंदेंच्या हॉटेल पॉलिटिक्स निर्णयाने.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुती म्हणून एकत्र लढलेल्या भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला मोठं यश मिळालं. मात्र, यातलं मोठं यश फक्त भाजपलाच मिळालं असून शिंदेंच्या शिवसेनेला केवळ 29 जागा जिंकता आल्या. मात्र, तरीही मुंबईत निवडून आलेल्या शिवसेना नगरसेवकांचा मुक्काम हॉटेलमध्ये हलवण्यात येत आहे. मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन होईपर्यंत, शिवसेनेच्या 29 नगरसेवकांना वांद्रे येथील ताज लँड्स एन्ड या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या नगरसेवकांची बेरीज केल्याशिवाय, भाजपप्रणित महायुतीला 114 ची मॅजिक फिगर गाठणं शक्य नाही. महायुतीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ठाकरे बंधू शिवसेनेचे नगरसेवक फोडू शकतात, अशी भीती एकनाथ शिंदेंना सतावत असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. याच भीतीपोटी एकनाथ शिंदेंनी त्यांच्या मुंबईतल्या नगरसेवकांचा मुक्काम हॉटेलमध्ये हलवल्याचं बोललं जातंय.
एकनाथ शिंदेंचं टेन्शन का वाढलं असावं? या प्रश्नाचं उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी केलेलं अॅनालिसीसही विचार करण्यासारखंच म्हणावं लागेल. फोडून आलेली माणसं टिकवण्याचं टेन्शन, कदाचित त्यांना भाजपची भीती वाटतेय, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी यॉर्करचा मारलाय. उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर एकनाथ शिंदे उत्तर देणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष असेलच, मात्र तूर्तास देवेंद्र फडणवीसांनी महायुतीचे कॅप्टन म्हणून लगेच उत्तर दिलंय. कुठलीही पळवापळवी होणार नाही, असे फडणवीसांनी स्पष्ट केले.
महापौर बसवण्याची ठाकरेंची इच्छा कायम
मॅजिक फिगर गाठली नसली तरी मुंबईत महापौर बसवण्याची उद्धव ठाकरेंची इच्छा कायम आहे, आणि ही इच्छा त्यांनी दिवसभरात दोनदा बोलून दाखवली. मुंबईत महायुतीचा महापौर बसणारय हे तर निकालांवर स्पष्ट झालंय. तो महापौर मराठीच असेल असं खुद्द फडणवीसांनी वारंवार सांगितलंय. पण, गेल्या 25 वर्षांत पहिल्यांदाच मुंबईचा महापौर शिवसेनेचा नसणार आहे. त्यावरूनच ठाकरेंचे शिलेदार संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंबद्दल आतापर्यंत न बोलून दाखवलेली सल पहिल्यांदा बोलून दाखवलीय. फुटीरवादी राजा थेट जयचंद असा नामोल्लेख संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंचा केलाय.
शिंदेंचं हॉटेल पॉलिटिक्स कशासाठी?
भाजपनं मुंबई काबिज करण्याचं स्वप्न अखेर पूर्ण केलंय पण शिंदेंच्या मदतीनंच भाजपचा पहिला महापौर मुंबईत विराजमान होणार आहे. त्यामुळेच ठाकरेंपेक्षा कमी असले तरी शिंदेंचे 29 नगरसेवक गेमचेंजर ठरणार आहेत. म्हणूनच की काय गुवाहाटीचा अनुभव असलेल्या शिंदेंना आपल्या 29 नगरसेवकांना हॉटेलमध्ये मुक्कामासाठी पाठवावं लागतंय. याशिवाय, शिंदेंकडून दवाबाचं राजकारण केलं जातंय का, महापौर किंवा स्थायी समिती सभापतीपदासाठी तर हे हॉटेल पॉलिटिक्स नाही ना, असाही प्रश्न राजकीय जाणकरांना पडलाय.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.