माहीम मच्छीमार नगरचा पुनर्विकास: नेत्यांच्या विधानांविरोधात 150 हून अधिक रहिवासी रस्त्यावर; एकज
मुंबई माहीम न्यूज मुंबई : माहीम येथील मच्छीमार नगर (इमारत क्र. 1 ते 20) मधील पुनर्विकासाच्या (Rविकास) मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काही लोकप्रतिनिधींकडून विधानपरिषदेत रहिवाशांच्या हिताच्या आड येणारी विधाने केली जात असल्याच्या निषेधार्थ, काल (1 मध्ये) मच्छीमार नगरमधील(माहीम न्यूज) 150 हून अधिक स्थानिक रहिवासी रस्त्यावर उतरले. ‘आमचा पुनर्विकास, आमचे निर्णय’ अशी भूमिका घेत रहिवाशांनी कोणत्याही परिस्थितीत फुटणार नाही आणि एकसंध राहून आपला हक्क मिळवू, असा निर्धार जाहीर केला आहे.
माहीम वार्ता: रहिवाशांचा तीव्र निषेध आणि शक्तीप्रदर्शन
काही राजकीय नेत्यांनी विधानपरिषदेत मच्छीमार नगरवासीयांना केवळ 550 चौ. फूट घर देण्याचा प्रयत्न केल्यामुळे रहिवाशांमध्ये तीव्र संताप आहे. या विधानाचा निषेध करण्यासाठी सुमारे 150 रहिवासी आणि महासंघाचे सदस्य एकत्र आले आणि त्यांनी औपचारिकपणे आपला विरोध दर्शवला. कोणत्याही अफवांना बळी न पडता, महासंघाच्या नेतृत्वाखाली आम्ही एकजूट राहू आणि आम्हाला हवे असलेल्या अटींनुसारच पुनर्विकास करू, असा ठराव या प्रसंगी सर्वानुमते करण्यात आला.
महासंघाच्या प्रमुख मागण्या व अटी:
PMC (प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार) ने सादर केलेल्या गणितानुसार रहिवासी खालील लाभांवर ठाम आहेत:
१०५० चौ. फूट कार्पेट क्षेत्रफळाचे हक्काचे घर.
दरमहा ५०,००० रुपये भाडे आणि त्यात दरवर्षी १०% वाढ.
२० लाख रुपये कॉर्पस रक्कम.
निवड प्रक्रिया आणि वेळापत्रक
पुनर्विकासासाठी पारदर्शक ऑनलाइन टेंडर प्रक्रियेद्वारे सक्षम विकासकाची निवड करण्यात येणार आहे. निवडलेला प्रस्ताव थेट म्हाडा कार्यालयात सादर केला जाईल.
टेंडर प्रक्रियेचे महत्त्वपूर्ण टप्पे:
निविदा दस्तऐवज वितरण: 24 एप्रिल ते 11 मे 2026 (PMC कार्यालय).
बोलीपूर्व बैठक: 12 मे 2026 (PMC कार्यालय).
शंकांचे निरसन: १३ मे २०२६ (ई-मेलद्वारे).
टेंडर सादर करणे: १६ मे २०२६ (सकाळी ११ ते संध्याकाळी ६, महासंघ कार्यालय).
टेंडर उघडणे: १६ मे २०२६ (संध्याकाळी ७:३०, महासंघ कार्यालय).
“बाहेरच्या व्यक्तींनी आमच्या पुनर्विकासात अडथळे आणू नयेत. आम्ही सर्व सभासद एकत्र आहोत आणि महासंघाच्या अधिकृत निर्णयानुसारच आमच्या नगराचा कायापालट होईल,” असे रहिवाशांनी या आंदोलनादरम्यान ठणकावून सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.