राज ठाकरेंनी BMC निवडणुकीसाठी 125 मोहरे निवडले; या 8 विधानसभा मतदारसंघात मनसेच्या सीट लागणारच?


राज ठाकरे मनसे बीएमसी निवडणूक 2025 मुंबई: मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या (Mumbai Municipal Corporation Elections 2025) पार्श्वभूमीवर प्रभाग आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 11 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबईच्या 227 प्रभागांसाठी आरक्षण सोडत काढली जाणार आहे. मुंबई महापालिकेचा कार्यकाळ 7 मार्च, 2022 रोजी संपुष्टात आला. तेव्हापासून मुंबई महापालिकेवर प्रशासक आहे. मुंबई महानगरपालिकेची मागील निवडणूक 2017 रोजी झाली होती.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) तयारीला लागली आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या (BMC Election 2025) पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) कार्यकर्त्यांकडून स्थानिक प्रभागाचा आढावा घेत आहेत. याचदरम्यान, मनसेकडून जवळपास मुंबईतील 227 पैकी 125 जागांची यादी काढण्यात आली आहे. ज्यामध्ये मनसेकडे चांगले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास तयार आहेत.

8 विधानसभा मतदारसंघात मनसेची ताकद- (Raj Thackeray MNS BMC Election)

माहीम, दादर, परळ, लालबाग, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, जोगेश्वरी या मराठी मतदार मोठ्या संख्येने असलेल्या जागांचा समावेश आहे. जागावाटपाच्या चर्चेआधी मनसेकडून जवळपास सव्वाशे जागांची यादी तयार करण्यात आली आहे. युती झाल्यास यामध्ये मनसे आणि ठाकरे यांच्या शिवसेनेला किती जागा मिळणार हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी दोन्ही पक्षांकडून आपली ताकद असलेल्या जागा या बाजूला काढल्या जात आहेत.

कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक, पाहा आकडेवारी- (BMC Corporate List)

मुंबइ महानगरपालिकेत एकूण 227 नगरसेवक निवडून जातात. बहुमताचा आकडा 114 आहे. यात शिवसेनेचे एकूण 93 नगरसेवक आहेत. यात मनसेतून शिवसेनेत प्रवेश केलेले 6 नगरसेवक आणि 3 अपक्ष नगरसेवकांचा पाठिंबा शिवसेनेला आहे. दुसऱ्या क्रमांकावर भाजप आहे. महापालिकेत भाजपचे 85 नगरसेवक आहेत. यानंतर काँग्रेसचे 30, राष्ट्रवादी काँग्रेसचे 9, समाजवादी पार्टी 6, एमआयएमचे 2 आणि मनसेचे 1 नगरसेवक आहे.

मुंबई महापालिकेच्या प्रभाग आरक्षण सोडत कार्यक्रम खालील प्रमाणे: (BMC Election 2025)

आरक्षित जागांची संख्या निश्चित करून आयोगाची मान्यता घेणे : 30 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर 2025

आरक्षण सोडतीची जाहिर सूचना वृत्तपत्रात प्रसिध्द करणे : 6 नोव्हेंबर 2025

आरक्षणाची सोडत आणि निकाल जाहिर करणे : 11 नोव्हेंबर 2025

प्रारुप आरक्षणाबाबत हरकती व सूचना मागवणे : 14 नोव्हेंबर 2025

प्रारुप आरक्षण हरकती व सूचना मागवण्याची अंतिम तारीख : 20 नोव्हेंबर 2025

हरकती व सूचनांवर विचार करून आयुक्तांनी घ्यावयाचा निर्णय : 21 ते 27 नोव्हेंबर 2025

अंतिम आरक्षण जाहीर करून वृत्तपत्रात प्रसिध्द करणे : 28 नोव्हेंबर 2025

संबंधित बातमी:

Raj Thackeray On BMC Election 2025: 227 पैकी 125 जागांवर मनसेची ताकद, मेरीटनूसार जागावाटप; मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राज ठाकरेंची जोरदार तयारी

आणखी वाचा

Comments are closed.