यंदा शिवाजी पार्कवर दीपोत्सव साजरा होणार नाही, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची घोषणा
दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे दरवर्षी दिवाळीत साजरा होणारा दीपोत्सव रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतला आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज ठाकरे यांनी एक व्हिडीओ शेअर करून दिली.
मनसेतर्फे शिवाजी पार्कमध्ये दरवर्षी दीपोत्सव साजरा होतो. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लोक हा दीपोत्सव पाहण्यासाठी येतात. परंतु महाराष्ट्रातील दुष्काळामुळे हा दीपोत्सव यंदा साजरा न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र विचित्र अवस्थेतून जात असून अनेक भागात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत दीपोत्सव साजरा करणे मनाला पटत नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
नम्र आवाहन. https://t.co/KDkGAVF0ZC
— राज ठाकरे (@RajThackeray) 4 नोव्हेंबर 2026
Comments are closed.