दारुच्या नशेत परप्रांतीयकडून राज ठाकरेंना शिवीगाळ; सुजित दुबे नको नको ते बोलला, अंधेरीत काय घडल
राज ठाकरे मुंबई: दारुच्या नशेत परप्रांतीयकडून मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांना शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. अंधेरी पूर्वत महाकाली रोडवर सुंदरनगर परिसरात राहणारा परप्रांतीय नागरिक सुजित दुबेकडून शिवीगाळ करण्यात आली आहे. सुजित दुबेने दारुच्या नशेत राज ठाकरे यांच्या आई-बहिणीवर शिवीगाळ केली. यादरम्यानचा व्हिडीओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
नेमकं प्रकरण काय?
सुजित दुबे दारच्या नशेत राज ठाकरेंना शिवीगाळ करत होता. सुजित दुबेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अंधेरीत मनसे कार्यकर्ता आणि पदाधिकारी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. व्हायरल व्हिडीओची दखल घेत एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ शिवीगाळ करणारा परप्रांतीय सुजित दुबेविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली. मनसे कार्यकर्त्यांनी एमआयडीसी पोलिसांना भेटून आरोपी विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्यासोबत शिवीगाळ करणारा आरोपीचे तीन अनाधिकृत धंद्यावर देखील कारवाई करण्याची मागणी केली. जर एमआयडीसी पोलिसांकडून शिवीगाळ करणारा आरोपीविरोधात कठोर कारवाई केली गेली नाही, तर पोलीस स्टेशन बाहेर आंदोलन करण्याचे मनसेकडून इशारा देखील देण्यात आला आहे.
नाशिकमध्ये परप्रांतीयाची मुजोरी-
नाशिकच्या जय भवानी रोड परिसरात परप्रांतीय आणि मराठी यांच्यात वाद झाल्याची घटना उघडकीस आली आहे. गाडी शिकणाऱ्या परप्रांतीय व्यक्तीने या भागातील एका गाडीला दिली धडक दिल्या नंतर या प्राप्रांतीय व्यक्तीने अरेरावी केल्याचा आरोप केला जात आहे. ”मराठी लोगो की औकात क्या तुम मराठी लोक भंगार हो”, अशी मुजोरी केल्याचा आरोप करण्यात आला या प्रकरणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना माहिती मिळाल्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांकडून परप्रांतीय व्यक्तीला समज देत होते, त्यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीला मराठी बोलण्याचा आग्रह धरला पण त्याने नकार दिल्यानं मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला चोप दिल्याची घटना घडली आहे, याप्रकरणी आद्यप गुन्हा दाखल झाला नसला तरीही गाडीला धडक दिल्या प्रकरणी पोलिसात तकार दिल्याची माहिती आहे.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.