जोगेश्वरी रेल्वे स्थानकात फुकट्या प्रवाशाकडून टीसीला मारहाण, सात टाके पडले
जोगेश्वरी रेल्वे स्थानकात विना तिकीट प्रवास केल्याप्रकरणी दंड भरण्यास सांगितल्याने फुकट्या प्रवाशाने टीसीला मारहाण केली. या मारहाणीत टीसीला गंभीर दुखापत झाली असून सात टाके पडले. रेल्वे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात भारतीय दंड संहिता कलम 121(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय शिवकुमार धिवर असे आरोपीचे नाव आहे.
आशिष रंजन गुप्ता हे पश्चिम रेल्वेत सीसीटीसी म्हणून कार्यरत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून गुप्ता हे जोगेश्वरी रेल्वे स्थानकात ड्युटी करत आहेत. बुधवारी सायंकाळी आपले कर्तव्य बजावत होते. गुप्ता यांनी आरोपीला तिकीट दाखवण्यास सांगितले. आरोपीकडे तिकीट नसल्याने त्यांनी त्याला 500 रुपये दंड भरण्यास सांगितला. आरोपीने दंड भरण्यास आणि आरपीएफ कार्यालयात जाण्यास नकार दिला.
आरोपीला कार्यालयात नेत असतानाच त्याने टीसी गुप्ता यांच्या चेहऱ्यावर जोरात बुक्का मारला. यात त्यांच्या चष्म्याची काच फुटून डोळ्याखाली गंभीर दुखापत झाली. त्यांना सात टाके पडले. सध्या ट्रॉमा केअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Comments are closed.