Mumbai News – मुंबादेवी परिसरात बेवारस बॅग सापडली, बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबादेवी परिसरात बेवारस बॅग सापडल्याने एकच खळबळ उडाली. मुंबादेवीच्या खतार गल्ली परिसरात ही बॅग आढळली. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक आणि बॉम्बशोधक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, संशयित बॅग आढळल्यानंतर परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. बॅगेची तपासणी सुरू आहे. बॅगमध्ये संशयास्पद वस्तू आहे याबाबत तपास सुरू आहे. नागरिकांना या परिसरापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed.