दळणाच्या जात्याचा दगड डोक्यात घातला, मोठ्या भावाला झोपेत असताना संपवलं

सोलापूर भाऊ हत्या प्रकरण : दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबर्गी येथे एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना उघडकीस आली आहे. पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा आणि कुऱ्हाडीच्या वाराचा बदला घेण्यासाठी लहान भावाने सख्ख्या मोठ्या भावाचा काटा काढला. शनिवार पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास मोठा भाऊ गाढ झोपेत असताना, लहान भावाने दळणाच्या जात्याचा जड दगड (पाटा) त्याच्या डोक्यात घालून त्याला संपवलं.

हे कृत्य केल्यानंतर लहान भावाने त्याच्या आईला ‘मी भावाला ठार मारलंय’ असं सांगितलं. घरासमोर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलाचा मृतदेह पाहून वृद्ध आईने एकच हंबरडा फोडला.

Mandrup Police Station Action : पळून जाण्याच्या तयारीत असताना आरोपीला अटक

या भीषण हत्याकांडात रेवणसिद्ध उर्फ महांतेश सूर्यकांत ऐवळे (वय 45, रा. निंबर्गी, ता. दक्षिण सोलापूर) असं मृत पावलेल्या दुर्दैवी मोठ्या भावाचं नाव आहे. तर या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी लहान भाऊ संतोष सूर्यकांत ऐवळे (वय 36, रा. निंबर्गी) याला पळून जाण्याच्या बेतात असताना अत्यंत चलाखीने ताब्यात घेऊन अटक केली आहे. याप्रकरणी मंद्रुप पोलीस ठाण्यात खुनाचा (Murder) गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण परिसरात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

Alcohol Addiction Dispute : कुऱ्हाडीने केलेल्या वाराचा होता राग

पोलीसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी संतोष ऐवळे आणि मृत रेवणसिद्ध या दोन्ही भावांना दारूचे प्रचंड व्यसन होते. दारूच्या नशेत त्यांच्यात नेहमी घरगुती कारणावरून वाद होत असत. गेल्या 15 दिवसांपूर्वी अशाच एका वादात मोठा भाऊ रेवणसिद्ध याने संतोष याच्यावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला करून त्याला गंभीर जखमी केलं होतं. त्या हल्ल्यात संतोषच्या छातीला आणि पोटाला गंभीर जखमा झाल्याने टाके पडले होते. रुग्णालयातील उपचारानंतर तो घरी परतला होता, मात्र भावाने आपल्याला मारल्याचा तीव्र राग त्याच्या मनात धुमसत होता.

Nimbargi Indira Nagar Murder : भाजीवरून वाद झाला

शनिवारी रात्री रेवणसिद्धची पत्नी माहेरी गेल्यामुळे त्याने स्वतः रात्री जेवणासाठी भाजी केली होती. जेवत असताना ‘भाजी चांगली झाली नाही’ असं म्हणून आरोपी संतोषने रागारागात ती भाजी थेट स्वतःच्या आईच्या अंगावर फेकली. यावरून दोन्ही भावांमध्ये रात्री पुन्हा एकदा जोरदार राडा झाला. मुलांमधील वाढता वाद पाहून घाबरलेले आई-वडील रात्री शेजारी राहणाऱ्या मल्लिकार्जुन गेजगे यांच्या घरी झोपण्यासाठी निघून गेले.

दोन्ही भाऊ रात्री घरासमोरील अंगणात वेगवेळ्या खाटेवर झोपले होते. पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास संतोषने झोपलेल्या रेवणसिद्धच्या डोक्यावर आणि तोंडावर जात्याचा दगडी पाटा घालून त्याचा जागीच जीव घेतला.

Solapur Police Investigation : पोलिसांकडून पंचनामा

ऐवळे कुटुंब राहत असलेल्या इंदिरानगर परिसरात सकाळी सख्ख्या भावानेच भावाचा खून केल्याचं समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी प्रचंड गर्दी केली होती. या थरारक घटनेची माहिती मिळताच मंद्रुप पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर पटवारी आणि हवालदार शहानुर मुलाणी तातडीने पथकासह घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी घटनास्थळाचा रीतसर पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि तो शवविच्छेदनासाठी (Post-Mortem) मंद्रुपच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी दिपाली ऐवळे हिने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला असून मंद्रुप पोलीस पुढील कायदेशीर तपास करत आहेत.

ही बातमी वाचा :

Brother Killed Brother, Mandrup Police, Crime News, Solapur District, Maharashtra Police, Solapur nimbargi भाऊ खून प्रकरण, मंद्रुप पोलीस स्टेशनने संतोष आयवळेला अटक केली, Solapur Crime branch updates, भाऊने दळणाच्या सहाय्याने भावाची हत्या, सोलापूर दारू व्यसन वादातून खून, महाराष्ट्र चालू गुन्हेगारी बातम्या

सोलापूर निंबर्गी भाऊ खून गुन्हा, मंद्रुप पोलीस ठाणे संतोष ऐवळे अटक, सोलापूर गुन्हेगारी वृत्त, भावाने भावाचा केला खून जात्याचा दगड, सोलापूर दारू वाद खून गुन्हा, दक्षिण सोलापूर इंदिरानगर गुन्हेगारी दखल

आणखी वाचा

Comments are closed.