दूध संकलन केंद्रावरुन 997 किलो पामतेलाचा साठा जप्त, सोलापुरात तुकाराम मुंढेंचा कारवाईचा दणका
सोलापूर बातम्या : आयएएस अधिकारी म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंढे नुकतेच अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी रुजू झाले आहेत. गेल्या 21 वर्षात ही त्यांची 25 वी बदली आहे. त्यांच्या कार्यशैलीप्रमाणे अन्न आणि औषध विभागात रुजू झाल्यानंतर त्यांनी कारवाईचा धडाका लावला आहे. प्रशासनाच्या आयुक्तपदी रुजू होताच राज्याच्या FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांची जोरदार मोहीम राबवली जात आहे. सोलापूर जिल्ह्यातही अन्न व औषध प्रशासन विभागानं कारवाईचा दणका दिला आहे. माळशिरसमधील दूध संकलन केंद्रावर 997 किलो पामतेलाचा साठा जप्त केला आहे.
दुधात भेसळ करण्यासाठी तेल आणल्याचा संशय
तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त पदाचा चार्ज घेतल्यानंतर राज्यभरात कारवाईचे सत्र सुरू आहे. याचाच भाग म्हणून माळशिरस तालुक्यातील जय हनुमान भाईनाथ दूध संकलन केंद्र तसेच अकलूज येथील व्यापारी जयकुमार दोशी यांच्यावर छापेमारी करत कारवाई केली आहे. यामध्ये 997 किलो पाम तेलाचा साठा दूध संकलन केंद्रावर आढळून आला. 2 लाख 44 हजार रुपयाचे पामतेल दिसून आले आहे. हे तेल दूध भेसळ करण्यासाठी आणले असल्याचा संशय आहे. या कारवाईनंतर जय हनुमान भाईनाथ दूध संकलन केंद्र तात्काळ बंद करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.. त्यामुळे तुकाराम मुंढे यांचा दणका आता सोलापूर जिल्ह्यातील कारवाई मध्ये दिसून येत आहे.
मुंबई, कोकण, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या विभागात मोठी कारवाई
दरम्यान, काल 30 मे रोजी एकाच दिवसात तब्बल 33 आरोपींना अटक करण्यात आले असून 28 आस्थापना सील करण्यात आल्या आहेत. याशिवाय लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मुंबई, कोकण, पुणेनाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या विभागात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला विक्रेते आणि नियमभंग करणाऱ्या आस्थापनाविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. या सर्व ठिकाणांवरून ६ लाख १७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यात मुंबईत दोन ठिकाणी कारवाई करण्यात आली असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
अन्न व औषधाबाबत तक्रारीसाठी नवीन “अॅप” तयार
राज्यातील अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांची नवीन संकल्पना राबवली आहे. भेसळयुक्त अन्न पदार्थावर धडक मोहीम राबवण्यासाठी तुकाराम मुंढे यांच्या पुढाकारातून आता अन्न व औषधाबाबत तक्रारीसाठी नवीन “अॅप” तयार करण्यात येणार आहे. याशिवाय तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांकही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नागरिकांना भेसळयुक्त आणि प्रतिबंधित अशा अनुचित घटना दिसल्या की, त्यांनी तत्काळ संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
आम्ही दोघेही प्रभावीपणे कार्य करू; अन्न व औषध प्रशासनचा पदभार स्वीकारताच नरहरी झिरवाळांना भेटले तुकाराम मुंढे
आणखी वाचा
Comments are closed.