देह व्यापारातून मराठी अभिनेत्रीची सुटका; गिरगावमधील घटनेने खळबळ, मेकअप आर्टिस्टला रंगेहाथ पकडलं

मुंबई पोलिसांनी मराठी अभिनेत्रीची सुटका केली. मुंबईतील (Mumbai News) सुसंस्कृत अशा गिरगाव (Girgaon News) परिसरातील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या कथित देहव्यापार रॅकेटवर पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत दोन अभिनेत्रींची सुटका करण्यात आली असून, त्यापैकी एक मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री (Marathi Actress) आहे. तर दुसरी अभिनेत्री बंगाली आणि हिंदी सिनेमांमध्ये (Hindi Movie) छोट्या तसेच कॅमिओ भूमिकांमधून झळकली आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका दलालाला रंगेहाथ अटक केली असून, तो सेलिब्रिटींसोबत काम करणारा मेकअप आर्टिस्ट असल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण कारवाईची माहिती मुंबई पोलिसांनी अधिकृत निवेदनाद्वारे दिली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास गुन्हे शाखेचे पोलीस करत आहेत.

पोलिसांच्या कारवाईत मराठीतल्या बड्या अभिनेत्रीची सुटका

मुंबई पोलिसांनी गिरगावमधील एका हॉटेलमधून चालवल्या जाणाऱ्या एका कथित हाय-प्रोफाईल वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश केलाय. कारवाईनंतर धक्कादायक बाब समोर आली. ती म्हणजे, या छाप्यादरम्यान, दोन अभिनेत्रींची सुटका करण्यात आली आहे. ज्यात एका आघाडीच्या मराठी अभिनेत्रीचा आणि बंगाली चित्रपटसृष्टी, बॉलिवूडमधील छोट्या भूमिकांशी संबंधित असलेल्या दुसऱ्या अभिनेत्रींचा समावेश आहे. या कारवाईदरम्यान, एका संशयित दलालाला अटक करण्यात आली, जो कथितरित्या सेलिब्रिटींशी संबंधित एक मेकअप आर्टिस्ट आहे. पोलीस आता आर्थिक व्यवहारांच्या व्यवहारांचा तपास करत आहेत, यात सामील असलेल्यांची चौकशी करत आहेत आणि हॉटेल व्यवस्थापनाच्या संभाव्य भूमिकेची कसून चौकशी करत आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असून, अधिक तपशील समोर येण्याची शक्यता आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “मुंबई पोलिसांनी गिरगावमधील एका हॉटेलवर छापा टाकून देह व्यापाराचा कथित अड्डा उद्ध्वस्त केला आणि दोन अभिनेत्रींची सुटका केली. यातील एक प्रसिद्ध अभिनेत्री मराठी असून तिनं अनेक सिनेमांत मुख्य भूमिका केल्या आहेत, तर दुसरी अभिनेत्री बंगाली आणि बॉलिवूड सिनेमांत छोट्या भूमिकांसाठी ओळखली जाते. या कारवाईदरम्यान एका दलालला रंगेहाथ पकडण्यात आलंय…” दरम्यान, मुंबई पोलिसांनी सुटका करण्यात आलेल्या महिलेची ओळख उघड केलेली नाही.

पोलिसांच्या माहितीनुसार, सुटका करण्यात आलेल्या सर्व महिलांना देह व्यापार करण्यास भाग पाडलं जात होतं आणि ग्राहकांकडून मोठी रक्कम उकळली जात होती. छापा टाकण्यापूर्वी या बेकायदेशीर कृत्याची खात्री करण्यासाठी पोलिसांनी एका बनावट ग्राहकाला पाठवलं होतं. आणि त्यानंतर छापा टाकत महिलांची सुटका केली.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Akanksha Chamola Get Divorce With Gaurav Khanna: आकांक्षा चमोला आणि टेलिव्हिजन सुपरस्टार गौरव खन्नाचा घटस्फोटाचं धक्कादायक कारण? ‘फिजिकल रिलेशन’मुळे संसारात मिठाचा खडा?

Comments are closed.