मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई: मुसळधार पावसामुळे (Rain) गेल्या दोन दिवसांपासून केंद्रीत असलेल्या मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघातात (Accident) झाल्याची घटना समोर आली असून अपघातात दोन जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. एर्टिगा कार आणि कंटनेरची धडक बसून हा अपघात झाला, त्यात एक गंभीर जखमी झाल्याचे समजते. तर, ठाण्यातील घोडबंदर रोडवरही (Thane) अपघाताची भीषण घटना घडली असून येथील अपघातातही दोघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर टँकरचालक घटनास्थळावरुन फरार झाला आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील माडप टनेल जवळ मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर एर्टिगा कार कंटेनरला धडकून झालेल्या अपघातात कारमधील दोन जण जागीच ठार झाले आहेत, तर एक जण गंभीर जखमी तर उर्वरित एक जण किरकोळ जखमी झाला आहे. अपघातामधील जखमींना पनवेल येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
घोडबंदर रोडवर भीषण अपघात, दोन ठार
ठाण्यातील घोडबंदर रोडवर आज दुपारी 12.45 च्या सुमारास आनंदनगर डी-मार्ट समोर गॅस टँकर रिक्षावर पलटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात रिक्षाचालक दशरथ पवार आणि प्रवासी मोहम्मद अमीन यांचा मृत्यू झाला, तर अमजित अन्सारी हे प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर वेदांत हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल असून क्रेनच्या मदतीने टँकर हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. सदर टेलरचा चालक हा घटनास्थळावरून पळून गेलेला असून याबाबत गुन्हा दाखल करून पुढील तपास स्थानिक पोलीस पंचनामा करून करीत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर पाणीच पाणी
मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीला मुसळधार पावसाचा फटका बसला असून पाताळी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने नदीचे पाणी थेट महामार्गावर आले आहे. मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याचं पाहायला मिळत आहे. काही वाहनचालकांचा पुराच्या पाण्यातून गाडी नेण्याचा जीवघेणा प्रयत्न देखील महामार्गावर दिसून येत आहे. डोंगरातून येणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग नसल्याचा फटका इथं दिसून येत आहे.
हेही वाचा
Comments are closed.