मनसेकडून मुंबईच्या मतदार यादीतील मोठा घोळ उघड, भाजपच्या वॉर्ड अध्यक्षाच्या नावाने 3 एपिक नंबर


मुंबई मतदार यादी घोटाळा: मुंबईच्या कांदिवली पश्चिमेत चारकोप परिसरात प्रभाग क्रमांक 20 मध्ये एकाच व्यक्तीची तीन ठिकाणी नावे आढळल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. यात भाजप (BJP) प्रभाग 20 चे वार्ड अध्यक्ष संतोष खंडू जाधव यांच्या नावावर तीन वेगवेगळे एपिक (EPIC) कार्ड असल्याचा दावा मनसेने केलाहे. तर अधिकृत यादीतही तिन्ही ठिकाणी टिक झाल्याचे सांगितले आहे.

Mumbai Voters List Scam : मनसेचा गंभीर आरोप, मतदार यादीवर आक्षेप

मतदारयादीतील या अनियमिततेमुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली असून मनसेचे चारकोप विधानसभा अध्यक्ष दिनेश साळवी यांनी निवडणूक आयोगाकडे तातडीने तपासणी व कठोर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यानवोट जिहादवर बोलताना यमुनाबाई गणपत कांबळे यांच्या फोटोऐवजी एका मुस्लिम महिलेचा फोटो निवडणूक यादीत लावण्यात आला आहे. असे दोषहे मनसेने केला आहे.

ECI vs Opposition : निवडणूक आयोगाने भेट नाकारली, मनसे-मविआ नेत्यांचा दिल्लीत ठिय्या

एकीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) आणि नितीन सरदेसाई (Nitin Sardesai) यांनी महाविकास आघाडीच्या (MVA) शिष्टमंडळासह दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाची (ECI) भेट घेण्याचा प्रयत्न केला. तर मतदार यादीतील गोंधळासंदर्भात तक्रार करण्यासाठी गेलेल्या या शिष्टमंडळाला आयोगाने भेट नाकारल्याने नेते संतप्त झाले. तर याच ‘तुम्ही भाजपसाठी काम करता की देशाच्या लोकशाहीसाठी?’ असा थेट सवाल काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी आयोगाला केला. यानंतर मनसे आणि मविआच्या नेत्यांनी आयोगाच्या कार्यालयातच ठिय्या आंदोलन केले. दिल्लीतील या घडामोडीनंतर, बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई हे मुंबईत परतले असून ते पक्षप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांना ‘शिवतीर्थ’ येथे संपूर्ण घटनेची माहिती देत आहेत.

मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे, राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) मतदार यादीचा कार्यक्रम बदलला आहे. आयोगाच्या अधिसूचनेनुसार, ‘प्रारूप प्रभागनिहाय मतदार यादी आता 14 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल’. यापूर्वीच्या वेळापत्रकात बदल झाल्याने निवडणूक प्रक्रियेला आणखी उशीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नवीन कार्यक्रमानुसार, मतदार याद्यांवरील हरकती आणि सूचना दाखल करण्याची अंतिम मुदत 22 नोव्हेंबरपर्यंत असेल. प्राप्त झालेल्या हरकती निकाली काढून 6 डिसेंबर रोजी अंतिम प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर, 8 डिसेंबरला मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध होईल आणि 12 डिसेंबर रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. मात्र, मतदार नोंदणीसाठीच्या कट-ऑफ डेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.