वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातून पहिल्या टप्प्यात घरं मार्चमध्ये मिळण्याची शक्यता,556 घरा
मुंबई : मुंबईतील वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील 556 घरांचं हस्तांतरण मार्च महिन्यात करण्यात येणार असल्याची माहिती आहे. मुंबईतील वरळी, नायगाव, ना.म. जोशी मार्ग आणि शिवडीतील बीडीडी चाळींचा पुनर्विकास म्हाडाच्या नेतृत्त्वात आणि राज्य सरकारच्या पाठिंब्यानं करण्यात येत आहे. वरळी येथे नव्यानं बांधकाम करण्यात आलेल्या अपार्टमेंटमधील 556 घरांच्या चाव्या मार्च 2025 मध्ये वरळी येथील बीडीडी चाळीतील पात्र रहिवाशांना करण्यात येणार आहे. यासंदर्भातील वृ्त्त इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रकाशित झालं आहे.
बीडीडी चाळी 1920 ते 1925 च्या दरम्यान ब्रिटीश सरकारकडून बांधण्यात आल्या होत्या. बीडीडीचं पूर्ण नाव बॉम्बे डेव्हलपमेंट डिपार्टमेंट असं होतं. ब्रिटिशांच्या काळात मुंबईत रोजगाराच्या निमित्तानं येणाऱ्या कामगारांच्या आणि स्थलांतरितांच्या निवासाच्या सोयीसाठी बीडीडी चाळी बांधण्यात आल्या होत्या. नंतरच्या काळात गिरणी कामगार आणि अल्प उत्पन्न गटातील कुटुंबासाठी महत्त्वाच्या ठरल्या.
मुंबईत सध्या 207 बीडीडी चाळी आहेत. यापैकी वरळीत 121 , नायगावमध्ये 42, ना.म. जोशी मार्ग 32 आणि शिवडीत 12 चाळी आहेत ज्या पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत.
चाळींच्या पुनर्विकासाच्या प्रकल्पाचं नियोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी प्रकल्पाचं अंदाजित मूल्य 16 हजार कोटी रुपये होते. बीडीडी चाळीतील जे रहिवासी सध्या 160 स्क्वेअर फुटांच्या घरांमध्ये राहतात त्यांना 500 स्क्वेअर फुटचं घर दिलं जाणार आहे. या प्रकल्पाचं पहिलं भूमिपूजन एप्रिल 2017 मध्ये झालं होतं.
म्हाडाकडून ऑगस्ट 2021 मध्ये वरळी, नायगाव आणि ना.म. जोशी मार्ग येथे कामाला सुरुवात करण्यात आली होती.
वरळी येथे नव्यानं बांधण्यात आलेल्या इमारत क्रमांक 1 च्या डी आणि ई विंगमील 556 घरांच्या चाव्या पात्र रहिवाशांना मार्च 2025 पर्यंत सोपवलं जाणं अपेक्षित आहे. वरळीत पहिल्या टप्प्यात 5198 घरांची निर्मिती केली जाणार आहे. याशिवाय म्हाडा उपलब्ध होणाऱ्या जागेत 1860 घरं मध्यमवर्ग उत्पन्न गटासाठी तर 1036 घरं उच्च उत्पन्न गटासाठी बांधणार असून लॉटरीद्वारे त्याची विक्री होईल.
वरळी येथील पुनर्विकासाच्या दुसऱ्या टप्प्यात 3974 घरांची बांधणी केली जाईल. म्हाडाला याठिकाणी 2184 घरं विक्रीसाठी उपलब्ध होतील. त्यात 1494 मध्यम उत्पन्न गट तर 1036 उच्च उत्पन गटासाठी असतील.
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पासाठी 20 हजार कोटींचा खर्च येण्याची शक्यता आहे. वरळीसह नायगाव फेज 1 चं बांधकाम सुरु आहे. ना.म. जोशी मार्ग येथे 10 बीडीडी चाळींचं पाडकाम करण्यात आलं आहे. शिवडीतमध्ये जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काम सुरु होईल.
इतर बातम्या :
अधिक पाहा..
Comments are closed.