महानगरपालिका निवडणुकीची घोषणा होताच पिंपरी-चिंचवडमध्ये चक्रं फिरली, दोन्ही राष्ट्रवादींची बैठक
पिंपरी चिंचवड : महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad Election) स्वबळाचा नारा दिला. याला काही तास उलटले न उलटले, पिंपरी चिंचवड शहरात पवार काका-पुतणे एकत्र येण्याच्या दृष्टीने पुढचं पाऊल पडलं. शहरातील अजित पवार राष्ट्रवादीचे निवडणूक प्रमुख नाना काटे आणि शरद पवार राष्ट्रवादीच्या निवडणूक कोअर कमिटीचे सदस्य सुनील गव्हाणे या दोघांची बैठक पार पडली. दोन्ही राष्ट्रवादीची एकत्रितरित्या अशी पहिल्यांदाच चर्चा झाली. यावेळी सुप्रिया ताईंचा मला काही दिवसांपूर्वी फोन आला होता. तेव्हा त्यांनी पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad Election) मध्ये मतविभाजन न करण्याचा आणि शरद पवार गटाच्या स्थानिकांशी चर्चा करण्याचा सल्ला दिला, असा दावा नाना काटे यांनी केला.(Pimpri Chinchwad Election)
नाना काटे आणि अजित गव्हाणे यांनी अजित दादा आणि सुप्रिया ताईंसह वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करतचं ही बैठक घेतल्याचं स्पष्ट केलं. या चर्चेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे तुतारीच्या चिन्हावर उमेदवार उभे करायचे? की फक्त घड्याळ चिन्हावर लढायचं? केवळ दोन्ही राष्ट्रवादीची आघाडी करायची की एकनाथ शिंदे शिवसेनेला सोबत घ्यायचं? भाजप विरोधी लढण्यासाठी यातील कोणतं समीकरण अंतिम करायचं? यावर दोन्ही राष्ट्रवादीने ही पहिल्यांदाच एकत्रितरित्या चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड निवडणुकीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात लढेल
राज्यात बहुतांश ठिकाणी भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मात्र भाजप आणि अजितदादांची राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात लढणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादांची राष्ट्रवादी आणि भाजप हे एकत्र लढू शकणार नाहीत. त्यावर अजितदादांशी चर्चा झाली आहे. आम्ही जर एकत्र लढलो तर त्याचा फायदा हा विरोधकांना होणार हे इतकं राजकारण आम्हाला दोघांनाही समजतं. त्यामुळे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढणार असून ती मैत्रीपूर्ण लढत असेल.
नगरपालिका निवडणूक एकमेकांच्या विरोधात लढलेले शिवसेना आणि भाजप हे महापालिका निवडणुकीत मात्र एकत्रित दिसणार आहेत. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आमच्यासोबत असेल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. मतदारयादीतील घोळावरुन विरोधक सातत्याने निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांना धारेवर धरतात. त्यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, थोड्या काही प्रमाणात मतदार याद्यांमध्ये घोळ असतो, ते आम्हीही दाखवलं आहे. पण त्यामुळे निवडणूकच घ्यायच्या नाहीत हे मत चुकीचं आहे. येत्या काळात एसआयआर प्रक्रियामुळे मतदार याद्यातील घोळ कमी होईल. पण निवडणूक आयोगाने पुढील काळात या याद्या ब्लॉक चेन मध्ये टाकाव्यात, म्हणजे सगळाच घोळ संपून जाईल.
आणखी वाचा
Comments are closed.