पुणे गुन्हेगारी मुक्त झालं पाहिजे असं म्हणता, पण…मुरलीधर मोहोळांची अजित पवारांवर टीका
अजित पवारांवर मुरलीधर मोहोळ पुणे : गुन्हेगारांना उमेदवारी देण्यावरुन केंद्रिय मंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol ) यांनी अजित पवारांवर (Ajit Pawar) टिका केली आहे. भाजपने हत्येचे अनेक आरोप असलेल्या रोहिदास चोरघेच्या पत्नीला प्रतिभा चोरघेला उमेदवारी का दिली? असा सवाल मुरलीधर मोहोळ यांना विचारला असता त्यांनी अजित पवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेल्या उमेदवारांकडे बोट दाखवलं आहे. पालकमंत्री एकीकडे पुणे गुन्हेगारी मुक्त झालं पाहिजे असं म्हणतात आणि दुसरीकडे शहराच्या पुर्वेपासुन पश्चिमेपर्यंत त्यांचे उमेदवार पाहिले तर ते कोणत्या तत्वात बसतं असं म्हणत मुरलीधर मोहोळ यांनी टीका केली.
भाजपने प्रभाग क्रमांक 38 मधुन हत्येचे , गोळीबार आणि अपहरणाचे अनेक गुन्हे दाखल असलेल्या रोहिदास चोरघेच्या पत्नी प्रतिभा चोरलेला उमेदवारी दिली आहे. त्याबद्दल विचारलं असता मोहोळ यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून देण्यात आलेल्या सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर आणि बापू नायर या गुन्हेगारी पार्श्वभुमीच्या असलेल्या उमेदवारांच्या उमेदवारीवर बोट ठेवलं आहे. गुन्हेगारांना उमेदवारी न देण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे असं मुरलीधर मोहोळ म्हणाले.
पुणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदेसेना युती तुटली
राज्यात भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) महायुतीचे सरकार आहे. पुणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदेसेना याची युती होणार असे मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केेले होते. शिंदेसेनेने भाजपकडे 35 जागेची मागणी केली होती. पण, प्रत्यक्षात 15 जागा देण्याची तयारी भाजपने दर्शविली. पण, सन्मानजनक जागा मिळत नसल्यामुळे शिंदेसेेनेने स्वबळावर निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 125 जागांवर शिंदेसेनेने उमेदवार दिले. युतीमध्ये कमी जागा वाट्याला आल्यामुळे शिंदेसेनेच्या निवडून येणाऱ्यांची संख्या कमी राहिली असती. आता स्वबळावर लढत असल्यामुळे युतीपेक्षा जास्त जागा शिंदेसेनेच्या निवडून येतील असा दावा शिवसैनिक करत आहेत. प्रत्यक्षात निवडणुकीच्या निकालानंतरच हे कळणार आहे.
पुणे महानगरपालिका निवडणुकांसाठी अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची युती झाली आहे. अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या गुप्त बैठका आणि गाठीभेटींनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनी पिंपरी-चिंचवड पाठोपाठ पुण्यातही एकत्रच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आधी जागावाटपामुळे आणि काही कारणामुळे प्रस्तावीत युती फिस्कटल्याची माहिती समोर आली होती, त्यानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरती शिक्कामोर्तब झाले आहे. पुणे महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यात 40 जागांवर शरद पवारांची राष्ट्रवादी तुतारी लढणार आहे. तर पुण्यात भाजप आणि एकनाथ शिंदेंची सेना स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. तर काँग्रेस आणि उद्धवसेना एकत्र लढणार आहेत. उद्धवसेनेचे आणि मनसेची युती झाली आहे. उद्धव ठाकरेंच्या वाट्याला आलेल्या जागेतून मनसेला काही जागा देण्यात येणार आहे. भाजप आणि शिेंदेची युती न झाल्याने पुण्यात चौरंगी लढत होणार आहे.
आणखी वाचा
Comments are closed.