एन रंगसामी पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री
वृत्तसंस्था, पुण्डडेचेरी
पुण्डडेचेरी नवे मुख्यमंत्री म्हणून एन. रंगासामी यांनी बुधवारी शपथ घेतली आहे. पु•gचेरी या केंद्रशासित प्रदेशाचे उपराज्यपाल के. कैलासनाथन यांनी रंगासामी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्याला भाजप अध्यक्ष नितिन नवीन तसेच वरिष्ठ नेते बी.एल. संतोष उपस्थित होते. रंगासामी हे ऑल इंडिया एनआर काँग्रेसचे संस्थापक असून त्यांचा पक्ष रालोआत सामील आहे.
शपथविधीनंतर रंगासामी यांनी मतदारांचे आभार मानत नव्या सरकारच्या प्राथमिकतांविषयी माहिती दिली. लोकांच्या कल्याणासाठी सर्व आवश्यक योजनांना आणखी प्रभावीपणे लागू करणे आमचे कर्तव्य आहे. आम्ही निश्चितपणे या जबाबदारीला पूर्णपणे झोकून देत पार पाडणार आहोत असे रंगासामी यांनी पत्रकारांना संबोधित करताना म्हटले आहे.
खातेवाटप लवकरच
खातेवाटप चालू किंवा पुढील आठवड्यात केले जाणार आहे. भात सरकार अनेक योजनांमध्ये आमचे समर्थन करते. यामुळे सुविधा अन् पर्यटनाला बळ मिळतेय. आगामी काळात मंत्रिमंडळ विस्तार होणार की नाही याचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील असे त्यांनी सांगितले. एआयएनआरसी नेते मल्लादी कृष्ण राव यांनी तेलगू भाषेत मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राव हे आंध्रप्रदेशला लागून असलेल्या पु•gचेरीच्या एन्क्लेव ‘यानम“चे प्रतिनिधित्व करतात.
पु•gचेरी विधानसभा निवडणुकीत रालोआने विजय मिळवित सत्ता राखली होती. 30 सदस्यीय पु•gचेरी विधानसभेत एआयएनआरसीने 12 जागा तर भाजपने 4 जागा जिंकल्या होत्या. अण्णाद्रमुकचा एक आमदार निवडून आला होता. द्रमुकला 5 आणि काँग्रेसला एक जागा मिळाली होती. टीव्हीकेने पु•gचेरीत दोन जागा पटकाविल्या होत्या.
सिंगापूरप्रमाणे करू विकसित
आम्ही आमच्या पुण्डडेचेरीला सिंगापूरप्रमाणे विकसित करणार आहोत असे उद्गार त्यांनी काढले आहे. तर भाजप नेते ए. नमस्सिवयम यांनी पुण्डडेचेरी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. आम्ही लोकांच्या सेवेत आहोत आणि सर्व योजना जारी राहतील. याचबरोबर आम्ही नव्या योजना सुरू करणार आहोत. आम्ही पु•gचेरीला अत्यंत चांगल्याप्रकारे विकसित करू असे नमस्सिवयम यांनी म्हटले आहे.
Comments are closed.