IPL 2026 – चेन्नईच्या संघात नव्या खेळाडूची एंट्री; रामकृष्णच्या जागी मॅकलीनला संधी
यंदाची आयपीएल अखेरच्या टप्प्यात आली आहे. चेन्नई सुपर किंग्जचे अजून तीन सामने बाकी आहेत. मात्र, त्याचवेळी पाच वेळा आयपीएल विजेतेपद पटकावलेल्या चेन्नईने कर्नाटकचा अष्टपैलू खेळाडू मॅकनील हॅडली नोरोन्हा याला करारबद्ध करत संघात स्थान दिले आहे. संघात दुखापतग्रस्त रामकृष्ण घोषच्या जागी मॅकनीलला संधी मिळणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चेन्नईच्या संघाने बीसीसीआयला पत्र लिहिले आहे. आणि हा कराराच्या मंजुरीची वाट पाहत आहे. या वृत्ताला स्वतः चेन्नईचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांनी दुजोरा दिला आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धचा सामना खेळताना रामकृष्णचा पाय फ्रॅक्चर झाला होता आणि त्यामुळे तो उर्वरित आयपीएल खेळणार नाही, हे स्पष्ट झाले होते. त्यावेळी चेन्नईच्या संघाने खेळाडू शोधायला सुरुवात केली आणि त्यांनी आता मॅकलीनची निवड केली आहे.
राजा ट्रॉफीमध्ये मॅकनीलची चमकदार कामगिरी
गेल्या वर्षी झालेली महाराजा ट्रॉफी मंगळूरू ड्रॅगन्सने जिंकली होती. त्या हंगामात 24 वर्षीय नोरोन्हा मंगळुरू संघाचा सदस्य होता आणि त्याने संघाला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने 13 सामन्यांमध्ये 148.82 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत 253 धावा केल्या होत्या. त्या हंगामात त्याने एकूण 19 षटकार मारले होते. मॅकनील हा एक ऑफस्पिनरदेखील आहे. त्याने स्पर्धेत 7.44 च्या इकॉनॉमीने गोलंदाजी करत 10 विकेट घेतले. मॅकलीनने हुबळी टायगर्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात 25 धावांत 2 विकेट घेतल्या होत्या, ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी होती. यानंतर मॅकनीलचा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी कर्नाटक संघात समावेश करण्यात आला, जिथे तो तीन सामने खेळला होता.
Comments are closed.