काँग्रेसमध्ये गटबाजी, पक्ष नेतृत्वाच्या मनमानीला कंटाळून बड्या नेत्यांसह कार्यकर्त्यांचा रामराम


नागपूर बातम्या : नागपूर जिल्ह्यातील काँग्रेस (Congress) नेतृत्वाच्या मनमानीला कंटाळून जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांनी काँग्रेस पक्षाला राजीनामा देण्याचा सपाटा सुरू केला आहे. कामठीचे नगराध्यक्ष साजा शेख यांनी पक्ष नेतृत्वावर गंभीर आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात (Ajit Pawar Ncp) प्रवेश केलाय. आपण सुनील केदार यांच्या हुकुमशाहीला कंटाळून राजीनामा (Congress Resignations) दिल्याचे राजा शेख यांनी जाहिरपणे सांगितले. तर दुसरीकडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे महासचिव प्रसन्ना तिडके यांनी भाजप (BJP) पक्षात प्रवेश केलाय.

जिल्ह्याचे नेतृत्व करणारे काँग्रेसचे (Congress) नेते हे कार्यकर्त्यांसोबत भेदभावपूर्वक वागतात, गटबाजीला खतपाणी घालतात. त्यामुळे आपण भाजप पक्षात प्रवेश केल्याचे प्रसन्ना तिडके यांनी सांगितले. मागच्या चोवीस तासात साजा शेख, प्रसन्ना तिडके, रामटेकचे शहर अध्यक्ष दामोधर धोपटे या तीन मोठ्या पदाधिकाऱ्यासह दोनशे प्रमुख कार्यकर्त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे.

Nagpur Congress : काँग्रेसच्या बहुतांश उमेदवाराणनाही एबीफार्मच मिळाला नाही; पक्षाच्या रणनीतीचा भाग?

दुसरीकडे, नागपूर जिल्ह्यात 15 नगर परिषद व 12 नगरपंचायात उमेदवारी अर्ज भरायचा आजचा शेवटचा दिवस आहे. मात्र काँग्रेसच्या बहुतांश उमेदवाराच्या हातात पक्षाचा एबीफार्म पोहचलेला नाही. बंडखोरी टाळण्यासाठी पक्षाच्या रणनीतीचा हा भाग असून ज्या उमेदवारांकडे एबीफार्म पोहचले नाही त्यांना सकाळी 10 वाजतापर्यंत एबीफार्म सुपूर्द केले जाईल, असे काँग्रेसचे खासदार श्यामकुमार बर्वे यांनी सांगितले. मात्र पक्षाच्या रणनीतीचा हा भाग असल्याचे सांगितले जात असले तरी अर्ज भरायचा शेवटचा दिवस असतांना एबीफार्म हाती नसल्याने अनेक उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.

Ashish Deshmukh : जे नेते भाजप पक्षात येईल त्यांना आम्ही योग्य सन्मान देवू

नागपूर जिल्ह्यात नाही, तर देशपातळीवर संसदेपासून तर राज्यात विधमंडळापर्यंत काँग्रेस पक्षात उभी फूट पडेल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधीच सांगितले आहे. नागपूर जिल्ह्यात पण हेच चित्र आहे. सध्या काँग्रेस पक्षात काही तारतम्य राहिलेले नाही, काँग्रेस पक्षात अंतर्गत भांडण खूप आहे. त्यामुळे आज अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी पण जे स्थानिक नेते भाजप पक्षात येईल त्यांना आम्ही योग्य सन्मान देवू, असे आशिष देशमुख म्हणाले.

इतर महत्त्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Comments are closed.