वर्चस्वाच्या लढाईचा रक्तरंजित शेवट, सासरवाडीहून परतताना कुख्यात गुंडाला कुऱ्हाड अन् बेसबॉल बॅटन

नागपूर गुन्हा: नागपूर शहरातील यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या (Yashodhara Nagar Police Station) हद्दीतील राजीव गांधीनगर पुलिया परिसरात गुरुवारी पहाटे कुख्यात गुन्हेगार समीर शेख उर्फ येडा शमशेर खान (30) याची निर्घृण हत्या करण्यात आली. वर्चस्वाच्या वादातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. (Nagpur Crime News)

समीर शेख (Sameer Shaikh) हा राजीव गांधीनगर (Rajiv Gandhi Nagar) परिसरातील रहिवासी होता. त्याच्यावर परिमंडल क्रमांक 5 अंतर्गत खुनाचा प्रयत्न, मारहाण, एमपीडीएस अधिनियमासह तब्बल 31 हून अधिक गुन्हे नोंद होते. तो गांजाची तस्करी आणि इतर गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय होता, त्यामुळे परिसरात त्याची दहशत होती.

पूर्वनियोजित कट रचून हल्ला

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे समीर शेख मोमिनपुरा येथील सासुरवाडीतून परतत असताना त्याच्यावर घातपात झाला. अशु नावाच्या गुन्हेगाराने आपल्या टोळीच्या मदतीने समीरवर कोयते आणि बेसबॉल बॅटने प्राणघातक हल्ला केला. या आरोपींचा निवाससुद्धा हल्ला झालेल्या परिसरातच असल्याचे समोर आले असून, हल्ल्यानंतर सर्व आरोपी फरार झाले आहेत.

पोलीस तपास सुरू, परिसरात तणाव

घटनेची माहिती मिळताच यशोधरा नगर पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गंभीर जखमी समीर शेखचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता, त्यामुळे अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात काही संशयितांना ताब्यात घेतले असून, मुख्य आरोपी अशु आणि त्याच्या टोळीचा शोध सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुरावे तपासले जात आहेत.

वर्चस्वाच्या संघर्षातून हिंसक शेवट

या हत्येमागे स्थानिक गुन्हेगारी टोळ्यांतील वर्चस्वाचा संघर्ष असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. समीर शेख आणि अशु यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू होता, ज्याचे रूपांतर अखेर या भयंकर हत्येत झाले. सध्या या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे आणि नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

इतर महत्त्वाच्या बातम्या

Gopichand Padalkar Worker Sharnu Hande: सात जण आले, कोयता, हॉकी स्टिकने बेदम मारलं, पाय बांधून गाडीत बसवलं अन्…; अपहरण झालेल्या पडळकरांच्या कार्यकर्त्याने सांगितली आपबिती

Ratnagiri Crime : हात-पाय घट्ट बांधलेली निवृत्त शिक्षिकेची बेडवर सापडली बॉडी; मैत्रिणीसोबत फिरायला जाणार होत्या, रत्नागिरीत काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.