पोलीस हवालदाराचे टोकाचे पाऊल, राहत्या घरातच संपवली जीवन यात्रा, नागपुरातील घटना

नागपूर: शहारातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात नागपुरातील वाडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या हवालदाराने आर्थिक तणावातून आपले जीवनमान संपवल्याची (Nagpur Crime News) माहिती पुढे आली आहे. हेमराज ज्ञानेश्वर जीचकर असं मृतक पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून त्यांनी आपल्या राहत्या घरीच ही आत्महत्त्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पुढील कारवाई पोलीस करत आहे.

राहत्या घरातच संपवली जीवन यात्रा, नागपुरात खळबळ

मिळालेल्या माहितीनुसार,  हेमराज  जीचकर यांनी प्लॉट खरेदी केला असतांना रजिस्ट्री जवळ येऊन पैश्याची जुळवा जुळव होत नसल्याने ते गेल्या काही दिवसांपासून आर्थिक तणावात होते. दरम्यान, शुक्रवारी साप्ताहिक रजा असताना घरात पत्नी, मुलगा आणि मुलगी बाहेर गेले असताना त्यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या करत टोकाचे पाऊल उचलले आहे . जीचकर हे वाडी पोलिसात कार्यरत असून घर गिट्टीखदान परिसरात घर असल्यानं घटनेची नोंद  गिट्टीखदान पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

पुणे पोलीस राबवणार गुन्हेगार दत्तक योजना, गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांचा निर्णय

पुणे शहरातील गुन्हेगारावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्यांच्या गुन्हेगारी समाजविघातक कारवायांना चाप लावण्याच्या उद्देशाने शहर पोलिसांनी गुन्हेगार दत्तक योजना तयार केली आहे. या अंतर्गत पोलीस ठाण्यातील प्रत्येक कर्मचाऱ्यावर काही गुन्हेगारांची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. संबंधित कर्मचाऱ्यांनी त्याच्या यादीतील गुन्हेगाराच्या हालचालीची तपासणी, त्यांच्या घरी भेट देणे किंवा त्याला ठाण्यात बोलून तपासणी करणे, इत्यादि अधिक गोष्टी करण्यास सांगितल्या आहेत.

पुणे शहरात गेले काही दिवसात वाहनांची तोडफोड घटना घडल्या आहेत. या प्रकरणाची पालकमंत्री अजित पवार यांनी दखल घेऊन पुणे पोलिसांना कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. या घडामोडीनंतर पुणे पोलीस सहआयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी एक बैठक घेतली. या बैठकीत दत्तक योजनेसह वाहन तोडफोडच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी गुन्हेगारांना जरब बसवण्याचे आदेश पोलिसांना दिले. गुन्हेगारावर एमपीडीए, तडीपारी, मकोका अंतर्गत कारवाईचे आदेश सहायुक्तांनी पोलिसांना दिले आहेत.

पुण्यातील PSI ने उचललं टोकाचं पाऊल

दरम्यान, अशीच एक घटना नुकतीच पुण्यात घडली होती. यात पोलीस उपनिरीक्षकाने लोणावळ्यात (Lonawala) जाऊन आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली. लोणावळ्यातील टायगर पॉईंटलगत त्यांनी झाडाला गळफास घेतल्यानं, पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. अण्णा गुंजाळ असं पोलीस (Police) उपनिरीक्षकांचे नाव असून त्यांनी नेमकी आत्महत्या का केली याबाबतचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..

Comments are closed.