शिक्षकाने वर्गात उठाबशा काढायला लावल्या, विद्यार्थ्याने गळ्याला दोर लावला, हायकोर्टाकडून शिक्षक

नागपूर गुन्हे: वर्गात विद्यार्थ्यावर रागावणे म्हणजे त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे ठरत नाही, असा निर्वाळा देत नागपूर खंडपीठाने बुलढाणा येथील एका शिक्षकाविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द केला आहे.बुलढाणा येथील एका शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्याला एका संकल्पनेची व्याख्या विचारली. मात्र, तो उत्तर देऊ शकला नाही. त्यामुळे शिक्षकांनी त्याला उठाबशा काढण्यास सांगितले.विद्यार्थ्याने पायाला दुखापत असल्याचे सांगून उठाबशा काढण्यास नकार दिला. त्यानंतर शिक्षकांनी त्याला फटकारले आणि त्याच्या पालकांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप आहे. त्याच दिवशी संबंधित विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.विद्यार्थ्याच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीत शिक्षकांनी रागावल्यामुळे आत्महत्या करत असल्याचा उल्लेख होता. त्यानंतर संबंधित शिक्षकाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा रद्द करत ‘वर्गात विद्यार्थ्यांवर रागावणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे ठरत नाही’ असा निर्वाळा कोर्टाने दिलाय.

नेमकं प्रकरण काय?

बुलढाणा जिल्ह्यातील एका शाळेत शिक्षकांनी वर्गात विद्यार्थ्याला एका संकल्पनेची व्याख्या विचारली. मात्र, विद्यार्थ्याला त्याचे उत्तर देता आले नाही. त्यानंतर शिक्षकांनी त्याला उठाबशा काढण्यास सांगितले. विद्यार्थ्याने आपल्या पायाला दुखापत असल्याचे सांगत उठाबशा काढण्यास नकार दिला. यानंतर शिक्षकांनी त्याला रागावल्याचा आणि त्याच्या पालकांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप करण्यात आला.त्याच दिवशी संबंधित विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीत शिक्षकांनी रागावल्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचा उल्लेख होता. त्यानंतर पोलिसांनी संबंधित शिक्षकाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता.

हायकोर्टाने काय म्हटलं?

या प्रकरणाची सुनावणी करताना नागपूर खंडपीठाने स्पष्ट केले की, एखाद्या विद्यार्थ्याला वर्गात रागावणे, त्याला प्रश्न विचारणे किंवा शिक्षा करणे, यावरून थेट आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा निष्कर्ष काढता येत नाही. न्यायालयाने नमूद केले की, शिक्षकांनी विद्यार्थ्याला आत्महत्या करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रवृत्त केले किंवा त्यामागे त्यांचा तसा हेतू होता, असे दर्शवणारे कोणतेही ठोस पुरावे तपासात समोर आलेले नाहीत. त्यामुळे भारतीय न्याय संहितेतील आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा या प्रकरणात टिकू शकत नाही. याच कारणावरून न्यायालयाने संबंधित शिक्षकाविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करत त्यांची निर्दोष सुटका केली.

Comments are closed.