नागपूर डेंटल कॉलेजमध्ये रॅगिंगचा भयंकर प्रकार, विद्यार्थ्याला विवस्त्र करून कोंबडा बनवला

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नागपूरच्या डेंटल कॉलेजमध्ये रॅगिंगचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. मेडिकलच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला विवस्त्र करून कोंबडा बनवला. याशिवाय तरुणासोबत अश्लील वर्तनही करण्यात आले. पीडित विद्यार्थी मूळचा उत्तर प्रदेशातील हमीरपूर येथील रहिवासी असून नागपूरच्या गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजमध्ये पहिल्या वर्गात शिकत होता. मोहम्मद हसनेन असे पीडित विद्यार्थ्याचे नाव आहे.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, बीडीएसच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या हसनेनने सीनियर विद्यार्थ्यांवर रँगिंगचा आरोप केला आहे. या घटनेनंतर हसनेनला मोठा मानसिक धक्का बसला असून त्याला कॉलेजमध्ये शिकायला भीती वाटते. हसनेनच्या कुटुंबीयांनी रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांवर, तसेच कॉलेज व्यवस्थापन आणि डीन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

हसनेनच्या कुटुंबीयांच्या माहितीनुसार, त्याला 26 ऑक्टोबर रोजी कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले होते. कॉलेजच्या पहिल्याच दिवशी वसतिगृहातील 13-14 सीनियर विद्यार्थ्यांनी त्याचे रॅगिंग केले. त्याला नग्न करून कोंबड्यासारखे उभे केले गेले आणि त्याच्यावर अश्लील कृत्ये करण्यात आली.

डीनकडे रॅगिंगबाबत तक्रार केली असता त्यांनी ही एक सामान्य गोष्ट असून अशा घटना घडत असतात असे सांगून प्रकरण फेटाळून लावले, असा आरोप हसनेनच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी अजनी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीत आयुष सी.आर., नरेंद्र सिंग, अमन खान आणि आणखी एका विद्यार्थ्याची नावे आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Comments are closed.