अवास्तव दंडामुळे ‘डॉक्टरी’ संकटात, पालिकेच्या रुग्णालयातील प्रकार
शैक्षणिक शुल्क आणि वसतिगृह फी वेळेत भरली नाही म्हणून पालिकेच्या टोपीवाला नॅशनल वैद्यकीय महाविद्यालय आणि बा. य. नायर रुग्णालयाने एका विद्यार्थ्याला अवास्तव दंड आकारला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्याचे डॉक्टर होण्याचे स्वप्न संकटात सापडले आहे.
एमबीबीएस शिक्षण पूर्ण झालेल्या एका विद्यार्थ्याने 3 लाख 43 हजार 100 रुपये शैक्षणिक शुल्क व वसतिगृह शुल्क न भरल्यामुळे 19 लाख 45 लाख 699 दंडासह सुमारे 22 लाख 81 हजार 699 रुपये भरण्याची नोटीस संबंधित विद्यार्थ्याला बजावली आहे. असाच प्रकार आणखी विद्यार्थ्यांच्या बाबतीतही घडला आहे. ज्यामध्ये दंडासह शुल्क न भरल्यामुळे विद्यार्थ्यांनी 2024-25 मध्ये इंटर्नशिप पूर्ण करूनही त्यांना इंटर्नशिप पूर्णत्वाचा दाखला मिळालेला नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना कोणत्याही रुग्णालयात कामही मिळत नाही.
असा आकारला दंड
शैक्षणिक शुल्क 2,80,000
शुल्कावरील दंड 9,22,546
वसतिगृह शुल्क 56,000
वसतिगृह दंड 10,23,153
Comments are closed.