चहाची किटली सांडपाण्यात धुतली, व्हिडीओ पाहून प्रवासी झाले ‘गरम’

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नालासोपारा पूर्व रेल्वे स्थानक परिसरातून एक अत्यंत संतापजनक आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारा प्रकार समोर आला आहे. नालासोपारा प्लॅटफॉर्म क्रमांक ४ समोरील रस्त्यावर साचलेल्या पावसाच्या सांडपाणीमिश्रित पाण्यात चहाच्या किटल्या धुतल्याचा संतापजनक व्हिडीओ व्हायरल झाला. हा किळसवाणा प्रकार पाहून नेटकऱ्यांसह प्रवासी चांगलेच ‘गरम’ झाले असून कारवाईची मागणी केली आहे.

वसई-विरारमध्ये यापूर्वी मासळीवर स्पे, घाण पाण्यात भाजी धुताना आढळून आले होते. मात्र आता व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक चहावाला रस्त्यावरील साचलेल्या अत्यंत अस्वच्छ पाण्यात चहाच्या किटल्या बिनधास्त धुताना स्पष्ट दिसत आहे. नालासोपारा रेल्वे स्थानक परिसरातून दररोज लाखो प्रवासी ये-जा करतात आणि यातील अनेक जण स्थानक परिसरातील गाड्यांवर चहा तसेच इतर खाद्यपदार्थ खातात.

पावसाळ्याच्या दिवसांत आधीच साथीच्या आजारांचा धोका वाढलेला असताना अशा प्रकारे दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा वापर भांड्यांसाठी केल्यामुळे नागरिकांना कॉलरा, टायफॉइड, गॅस्ट्रो यांसारख्या गंभीर आजारांची लागण होण्याची दाट शक्यता असते.

Comments are closed.