राजकारणात प्रत्येकाचा एक काळ असतो, वेळेच्या पुढे आणि नशिबापेक्षा जास्त काही मिळत नाही; विलासराव
नाना पटोले: “राजकारणात प्रत्येकाचा एक काळ असतो. माझे गुरु विलासराव देशमुख नेहमी सांगायचे की, वेळेच्या पुढे आणि नशिबापेक्षा जास्त कोणालाही काहीच मिळत नाही,” अशा शब्दांत काँग्रेसचे नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर सूचक वक्तव्य केले आहे. सोलापूर येथे बोलताना त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर चौफेर टीका केली.
सोनम वांगचूक (Sonam Wangchuk) यांनी पोलिसांनी ताब्यात घेतले, यावर बोलताना नाना पटोले म्हणाले, “सोनम वांगचूक प्रकरणात हुकूमशाही सुरु झालेली आहे. लोकांमध्ये सरकारच्या विरोधात उद्रेक व्हायला सुरुवात झाली आहे. आमरण उपोषण कराल तर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाकायचे, असा कायदा केंद्र सरकारने केलेला आहे. महात्मा गांधींची तत्व केंद्र सरकारने संपवलेली आहेत. दिल्लीतील पोलिसांनी जबरदस्ती चादरमध्ये बांधून हुकूमशाही पद्धतीने वागून लोकशाहीची हत्या करण्याचे काम केले आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला.
Nana Patole: देशभरात आता मोठा उद्रेक सुरु झालाय
नाना पटोले पुढे म्हणाले की, हायकोर्टचे डायरेक्शन काय होते? नीटमध्ये ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांना फाशीची शिक्षा द्यावी लागते, आता त्यात मार्कशीटचा घोटाळा आला आहे. तिथं मिल्ट्री लावावी लागते. देशभरात आता मोठा उद्रेक सुरु झालेला आहे, अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली.
Nana Patole: नियमात बसत नसतानाही 6 खासदारांना मान्यता
“महाराष्ट्रात जेव्हा राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे विभाजन झाले, तेव्हाच जर ‘शेड्युल 3’ (Schedule 3) नुसार योग्य ती कारवाई केली असती, तर आज कोणाचेही असे धाडस झाले नसते. केंद्रात पाशवी बहुमताच्या जोरावर, नियमात बसत नसतानाही शिवसेनेच्या 6 खासदारांना मान्यता देण्यात आली, अशी टीका देखील नाना पटोले यांनी केली आहे.
Nana Patole: हे सरकार शेतकरी विरोधी
शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला धारेवर धरताना नाना पटोले म्हणाले, “हे सरकार शेतकरी विरोधी आहे. मुख्यमंत्र्यांनी कृषी पंपांचे वीज बिल माफ केल्याची घोषणा केली आणि टाळ्या वाजवून घेतल्या. एकीकडे एक रुपया लुटायचा आणि दुसरीकडे जनतेला चार आणे द्यायचे, असे हे बेईमानांचे सरकार आहे. शेतकऱ्यांची चेष्टा करण्याचे काम सुरू असून भाजप हा शेतकरी विरोधी पक्ष आहे,” असे त्यांनी म्हटले.
Nana Patole: नशिबापेक्षा जास्त काही मिळत नाही
राजकारणात प्रत्येकाचा काळ असतो, माझे गुरु विलासराव देशमुख सांगायचे की, वेळेच्या पुढे आणि नशिबापेक्षा जास्त काही मिळत नाही. उद्याच्या धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात निघणाऱ्या मोर्चात काँग्रेस सहभागी होणार आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. तर अण्णा हजारे वयोवृद्ध आहेत. त्यांच्याबद्दल काय बोलणार? मात्र सध्या या भ्रष्टाचार सरकार विरोधात अण्णा शांत बसले आहेत, त्यांना कधीकाळी देशाचे महात्मा गांधी, असं म्हटलं जायचं, असे देखील नाना पटोले म्हणाले आहेत.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Comments are closed.