भाजपच्या ज्येष्ठ नेत्याला अभ्यासवर्गात बोलावून ऐनवेळी डावललं; अर्ध्या रस्त्यातून घरी पाठवलं!
नांदेड भाजप अंतर्गत तेढ नांदेड भाजपमध्ये (Nanded BJP) अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. पक्षाचे अत्यंत ज्येष्ठ नेते आणि माजी महामंडळ अध्यक्ष प्राध्यापक गणपतराव राऊत यांनी थेट नांदेड महानगर भाजप अध्यक्ष अमरनाथ राजूरकर (Amarnath Rajurkar) यांना पत्र लिहून आपला तीव्र अपमान झाल्याची खंत व्यक्त केली आहे. 1960 पासून संघ परिवार आणि जनसंघासाठी सायकलवरून प्रचार करणाऱ्या एका 83 वर्षीय निष्ठावान ज्येष्ठ नेत्याला भाजपच्याच एका अभ्यासवर्गात बोलावून ऐनवेळी डावलण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका ज्येष्ठ कार्यकर्त्याचा आपण अपमान केला, असं आपल्याला वाटत नाही का? असा थेट सवाल प्रा. राऊत यांनी पत्राद्वारे विचारल्याने नांदेड राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
Nanded BJP Internal Rift: एका फोन कॉलमुळे सगळंच बदललं; नेमकं काय घडलं?
दरम्यान17 मे रोजी सायंकाळी 7 वाजता हे सत्र सुरू होणार होते. प्रा. राऊत यांना नेण्यासाठी गाडी पाठवण्यात आली. ते गाडीत बसले आणि अचानक अर्ध्या रस्त्यात एका फोन कॉलमुळे सगळंच बदललं. ‘तुमचं सत्र रद्द झालं आहे, ते उद्या सकाळी होणार आहे,’ असं सांगून त्यांना अर्ध्या रस्त्यातूनच गाडीतून उतरवून घरी पाठवून देण्यात आलं. विशेष म्हणजे, त्यानंतर दुसऱ्या दिवशी ना कोणाचा निरोप आला, ना कोणी त्यांची साधी चौकशी केली. एका 83 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या ज्येष्ठ नेत्याला झालेल्या या वागणुकीमुळे प्रा. राऊत प्रचंड दुखावले गेले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.