सोलापूर विधान परिषदेला धक्कादायक ट्विस्ट! ‘या’ 3 महिला नेत्यांच्या नावांची जोरदार चर्चा

सोलापूर : भाजपासाठी एकतर्फी निवडणूक असणाऱ्या सोलापूर विधान परिषदेसाठी (Solapur MLC Election) महिला उमेदवार देण्याबाबत पक्षाकडून (Solapur MLC Election) जोरदार हालचाली सुरू झाल्या असून आता यासाठी रश्मी बागल, सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर श्रद्धा जवंजाळ आणि राजश्री नागणे या तीन नेत्यांची नावे रेसमध्ये आल्याची माहिती समोर येत आहे. सोलापूर विधान परिषदेच्या 616 मतांपैकी साडेचारशे पेक्षा जास्त मते भाजप आणि मित्रांकडे असून शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मतांची बेरीज केल्यास विरोधकांकडे अगदी मोजकी मते शिल्लक राहत आहेत.(Solapur MLC Election)

अशावेळी महिला आरक्षण धोरण डोक्यात ठेवून सहज निवडून येणाऱ्या जागांवर महिलांना संधी देण्यासाठी भाजपकडून जोरदार हालचाली सुरू झाले आहेत. त्यामुळे भाजपकडून अजून कोणीही उमेदवारी अर्ज घेण्यासाठी पक्षाने सूचना दिलेल्या नाहीत. सध्या सोलापूर विधान परिषदेसाठी (Vidhan Parishad Election 2026) जिल्हा परिषद सदस्य रश्मी बागल, सामाजिक कार्यकर्त्या श्रद्धा जवंजाळ आणि भाजप महिला आघाडीतील कोअर लीडर असणाऱ्या राजश्री नागणे ही तीन नावे पुन्हा एकदा नव्याने चर्चेत आली आहेत. (Solapur MLC Election)

सध्या भाजपकडून माजी आमदार प्रशांत परिचारक, राजेंद्र राऊत , विक्रम देशमुख, शिवाजीराव सावंत आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांचे उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र सोलापूरच्या जागेचा निर्णय मुख्यमंत्री हे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सल्ल्याने घेणार असल्याची माहिती आहे. अशावेळी पक्षाकडून सर्वात सेफ असणाऱ्या सोलापूर विधान परिषदेसाठी (Vidhan Parishad Election 2026) महिला उमेदवार देऊन महिला आरक्षण धोरण भाजप राबवित असल्याचे दाखवून द्यायचे आहे. त्यामुळेच सोलापूर विधान परिषदेसाठी महिलांना संधी देण्याबाबत जोरदार हालचाली सुरू झाले आहेत. आता उमेदवारी दाखल करण्यासाठी मोजकाच कालावधी शिल्लक असताना अनपेक्षित नाव पुढे येण्याची शक्यता आहे.(Solapur MLC Election)

Solapur MLC Election:  पुणे विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच

पुणे विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच सुरू असल्याचं दिसून येत आहे. पुण्याची जागा भाजपनेच लढवावी यासाठी भाजपच्या आमदार, पदाधिकारी आणि इच्छूकांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे. आमदार राहुल कुल, आमदार शंकर जगताप, हेमंत रासने, सुनिल कांबळे आणि गणेश बीडकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. पुण्यातील जागेसाठी भाजपकडून जगदीश मुळीक, राजेश पांडे आणि गणेश बीडकर यांच्या नावाची चर्चा आहे. (Vidhan Parishad Election 2026)

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.