नरेंद्र मोदी आज सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार; बैठकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष

नरेंद्र मोदींची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक इराण आणि अमेरिका, इस्त्रायलच्या युद्धामुळे (Iran-Israel-America War) पेट्रोल-डिझेलचा (Petrol-Diesel) तुटवडा निर्माण झाल्याची केवळ अफवा आहे. राज्यात अनेक शहरांमध्ये इंधन टंचाईच्या अफवा पसरवण्यात येत आहे. त्यामुळे पेट्रोल पंपावर मोठी गर्दी होत आहे. राज्यातील अनेक पेट्रोल पंपावर भल्या मोठ्या रांगा लागल्यात. परिणामी अनेक पेट्रोल पंपावरील पेट्रोल आणि डिझेलचा साठा संपलाय. छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, नांदेडसह परभणीमध्ये इंधनसाठ्यावर मर्यादा लावण्यात आल्यात. युद्धामुळे पेट्रोल, डिझेलचा साठा संपेल अशा अफवा सोशल मिडीयावरून पसरवण्यात येताय. त्यामुळे भीतीपोटी नागरिक अतिरिक्त साठाही करून ठेवत आहेत. (petrol diesel Shortage india)

आखाती देशात सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आज भारतात महत्त्वाची बैठक होणार आहे. आज नैसर्गिक आणि पेट्रोलियम गॅससंदर्भात महत्त्वाची बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करणार आहेत. आज सायंकाळी 6.30 वाजता ही महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. प्रत्येक राज्यातील सध्याचा इंधन पुरवठा यासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती आहे. भविष्यातील उपाययोजनांसंदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? (Devendra Fadnavis On Petrol Diesel Maharashtra)

मी महाराष्ट्रातील तमाम जनतेला विनंती करतो केंद्र सरकारने वारंवार सांगितले आहे. आपल्याकडे पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा आहे तरी लोक रांगा लावून जास्तीचा पेट्रोल भरून घेत आहेत. प्रत्येकाला जेवढा पेट्रोल डिझेल दर महिन्याला लागतो तेवढीच त्यांनी खरेदी करावी अशी विनंती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेलचा कोणी काळाबाजार करणार असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई होईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देशात कुठेही पेट्रोल, डिझेल किंवा LPG ची कमतरता नाही- (Petrol-Diesel Update In India)

काही ठिकाणी जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरवून भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा अफवांपासून दूर राहावे आणि केवळ अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा, असं मंत्रालयाने म्हटलं आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात कुठेही पेट्रोल, डिझेल किंवा LPG ची कमतरता नाही. सर्व रिटेल फ्युएल आउटलेट्सकडे पुरेसा साठा उपलब्ध असून वितरण सुरळीत सुरू आहे. पुरवठा साखळी मजबूत असून कोणत्याही प्रकारचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता सध्या नाही.

इराणमध्ये आतापर्यंत 1 हजार 937 जणांचा मृत्यू- (Iran-Israel-America War)

इस्रायल-अमेरिका यांच्या संयुक्त हल्ल्यात इराणमध्ये आतापर्यंत 1 हजार 937 जणांचा मृत्यू झाला आहे. इराणचे उपआरोग्य मंत्री अली जाफरियन यांनी, मृतांचा आकडा वाढल्याची माहिती दिली. मारल्या गेलेल्या 1 हजार 937 लोकांमध्ये 240 महिला आणि 212 मुलांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, किमान 24 हजार 800 लोकं जखमी झाले असून, त्यात सुमारे 4 हजार महिला आणि 1 हजार 621 मुलांचा समावेश आहे.

संबंधित बातमी:

Lockdown Fact Check: भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? पंतप्रधान मोदींच्या विधानानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण; जाणून घ्या सत्य

आणखी वाचा

Comments are closed.