नाशिकच्या ‘कॅप्टन’ मांत्रिकाला अटक, पोलिसांना सापडले 58 व्हिडीओ , नामांकित महिला सेलिब्रिटी, अध
नाशिक : बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अशोक खरात उर्फ ‘स्वघोषित कॅप्टन’ याला नाशिक क्राइम ब्रांच युनिट 1 ने अटक केली आहे. संबंधित आरोपीविरुद्ध बलात्काराचा (Nashik Crime news) गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. तपासादरम्यान पोलिसांनी तब्बल ५८ व्हिडिओ जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडिओंमध्ये (Nashik Crime news) काही नामांकित महिला व सेलिब्रिटी संबंधित असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. पोलिसांकडून जप्त करण्यात आलेल्या व्हिडिओंची सखोल तपासणी सुरू असून, त्यामधून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास नाशिक क्राइम ब्रांच युनिट 1 करीत आहे.(Nashik Crime news)
खरात उर्फ कॅप्टन या भोंदूगिरी करणाऱ्या मांत्रिकाची सखोल चौकशी व्हावी
नाशिकमधील बहुचर्चित खरात उर्फ कॅप्टन या भोंदूगिरी करणाऱ्या मांत्रिकाला क्राइम ब्रांच युनिट एकने अटक केली असून या मांत्रिकाच्या विरोधात एका महिलेने तक्रार दिली होती. धमकी देऊन आणि गुंगीचे औषध देऊन एका महिलेवर बलात्कार केलाचा गुन्हा नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने खरात उर्फ कॅप्टन याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांकडून ५८ व्हिडिओ जप्त केल्याचे सांगत या व्हिडिओमध्ये नामांकित महिला तसेच सेलिब्रिटी वरिष्ठ अधिकारी आणि काही राजकीय नेत्यांची माहिती असल्यास देखील माहिती मिळत आहे. पोलिसांकडून या व्हिडिओची सखोल तपासणी सुरू असून यात अनेक धक्कादायक बाबींचा समावेश असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात भोंदूगिरी करणाऱ्या खरात उर्फ कॅप्टन यांची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. (Nashik Crime news)
काय आहे प्रकरण?
नाशिकमध्ये सरकारवाडा पोलिसांत संशयित अशोक खरात याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अशोक खरात उर्फ ‘स्वघोषित कॅप्टन’ याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. आज (बुधवार १८ मार्च) खरात याला पहाटे ३ वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आले. यासंदर्भात सध्या अधिक चौकशी सुरु आहे. धक्कादायक म्हणजे त्याच्याकडून जप्त केलेल्या पेन ड्राइव्हमध्ये ५८ आक्षेपार्ह व्हिडीओ असून, त्याची सत्यता पडताळण्यात येत आहे.(Nashik Crime news)
कोण आहे अशोक खरात उर्फ ‘ स्वघोषित कॅप्टन’ ?
नाशिकमधील सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असलेला कॅप्टन अशोक खरात हा सेवानिवृत्त आहे. तो प्रसिद्ध अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळखला जातो. नोव्हेंबर २०२२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिरगाव येथील मंदिरात भेट दिल्यानंतर अशोक खरात चर्चेत आला होता. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी जात असतात. त्याचं खरं रुप समोर आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
कॅप्टन अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी आहे. ‘शिवनिका ट्रस्ट’च्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, मर्चंट नेव्हीमध्ये २२ वर्षांच्या कारकिर्दीत खरातने १५४ देशांचे दौरे पूर्ण केले आहेत. त्यामुळे त्या देशांमधील बहुतांश धार्मिक चालीरीती, परंपरा, संस्कृती, नैतिकता आणि नैसर्गिक परिस्थिती यांचा त्याने सखोल अभ्यास केला असल्याचे मानले जाते. खरातने आपले लक्ष ‘कॉस्मॉलॉजी’ (विश्वशास्त्र) नावाच्या विज्ञानशाखेच्या अभ्यासाकडे वळवले, तेव्हा त्याच्या आयुष्याला रंजक वळण मिळालं. कॉस्मॉलॉजीने गेल्या १०० वर्षांत प्रचंड प्रगती साधली आहे. आइन्स्टाईन यांच्या १९१७ मधील विश्वाच्या ‘स्थिर प्रतिमाना’द्वारे (static model) सैद्धांतिक भौतिकशास्त्राची एक शाखा म्हणून याची सुरुवात झाली; आणि सुरुवातीच्या काळात, विशेषतः लेमैत्र (Lemaître) यांच्या कार्यामुळे या शाखेचा विकास झाला.
आणखी वाचा
Comments are closed.