प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल
नितेश राणे बातम्या पुणे : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरुन राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळत आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. या प्रकरणावरुन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला आहे. तसेच अनेक राजकीय नेत्यांचे फोटो अशोक खरातबरोबर व्हायरल झाले आहेत. अशातच या प्रकरणावर मंत्री नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणातील पीडित महिलांनी थेट सरकारशी संपर्क साधावा, त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आवाहन नितेश राणे यांनी केलं आहे.
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही “सडके आंबे” निघतातच, त्यामुळे सरकार महिलांच्या बाजूने ठामपणे उभे आहे. तसेच, या भोंदू बाबाचे सर्वपक्षीय नेत्यांशी संबंध असल्याच्या प्रश्नावर त्यांनी पत्रकारांनाच प्रतिप्रश्न करत अधिक बोलणे टाळले. विरोधकांवर टीका करताना त्यांनी म्हटले की, हिंदू धर्माची बदनामी होत असताना काही जणांना त्यातच आनंद मिळतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. ते पिंपरी- चिंचवड येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
नाशिकचा भोंदू ज्योतिषी अशोक खरात याचे एक एक कारनामे समोर
नाशिकचा भोंदू ज्योतिषी अशोक खरात याचे एक एक कारनामे समोर येत आहे. राजकीय वरदहस्तामुळे त्याचे काळे कारनामे सुरू होते. अनेक महिलांचे लैंगिक शोषण त्याने केले. त्याचे 100 हून अधिक व्हिडिओ समोर आले आहेत. इतकेच नाही तर दमदाटी करून, धमक्या देऊन त्याने मोक्याच्या जमिनीही लाटल्याची माहिती समोर येत आहे. त्याचे गोरखधंदे अजूनही बाहेर येत आहेत. तर या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची पहिली विकेट पडली आहे. त्यांनी काल पदाचा राजीनामा सोपवला. मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
चौकशीसाठी IPS तेजस्विनी सातपुतेंच्या नेतृत्वात एसआयटी पथक
अशोक खरात याचा ऑफिस बॉय नीरज जाधव याने महिलांसोबतच्या दृषकृत्याचे व्हिडिओ काढल्याचा संशय आहे. शिर्डीतील एका पीडितेला आणि खरात याला ब्लॅक करण्यासाठी त्याने एक व्हिडिओ लीक केला आणि या प्रकरणाचे बिंग फुटले. याप्रकरणी IPS तेजस्विनी सातपुतेंच्या नेतृत्वात एसआयटी पथक स्थापन करण्यात आले आहे. SIT च्या पथकात नाशिक शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील 12 वरीष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. कॅप्टन खरात प्रकरणात दाखल 3 गुन्ह्यांचा वेगाने तपास सुरू आहे. व्हिडीओतुन तांत्रिक विधीच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करत असल्याचं समोर आले आहे.
आणखी वाचा
Comments are closed.