गिरीश महाजन नाशिकमध्ये असतानाच भाजप नेत्याला पोलिसांनी उचललं; गोळीबार प्रकरणात बेड्या, राजकीय व
नाशिक गुन्हा: नाशिक शहरातील पंचवटी (Panchavati) परिसरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या सागर जाधव गोळीबार प्रकरणात (Sagar Jadhav Firing Case) मोठी कारवाई करत पंचवटी पोलिसांनी (Panchavati Police) भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील (Jagdish Patil) यांना अटक केली आहे. विशेष म्हणजे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) हे नाशिकमध्ये असतानाच जगदीश पाटील यांना अटक झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. (Nashik Crime)
काही दिवसांपूर्वी पंचवटीतील फुलेनगर परिसरात सागर विठ्ठल जाधव या युवकावर गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यात सागर जाधव गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक तपासात या हल्ल्यामागे पूर्ववैमनस्य आणि टोळीयुद्ध असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणात 11 आरोपींना अटक केली होती. तर दोन आरोपी अजूनही फरार असून, त्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जात होता.
जगदीश पाटलांना पोलिसांकडून अटक (Jagdish Patil Arrested)
आता या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं आहे. यामुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
काही दिवसांपूर्वीच उद्धव निमसेंनाही बेड्या (Uddhav Nimse Arrested)
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच भाजपचे आणखी एक माजी नगरसेवक उद्धव निमसेंना राहुल धोत्रे हत्याकांडप्रकरणी अटक करण्यात आली होती. आता सलग दुसऱ्यांदा भाजपच्या माजी नगरसेवकांवर झालेल्या पोलीस कारवाईमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे मंत्री गिरीश महाजन आज सोमवारी नाशिक दौऱ्यावर असतानाच भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.