कायद्याचा बालेकिल्ला म्हणणाऱ्या नाशिक पोलिसांना रोडरोमिओंचं चॅलेंज, रनिंगला गेलेल्या तरुणीची टव
नाशिक क्राईम न्यूज : “नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक शहरातील पोलिसांसमोरच (Nashik Police) आता रोडरोमिओंचे आव्हान उभे राहिल्याचे चित्र समोर आले आहे. शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या गंगापूर रोड परिसरात 17 वर्षीय तरुणीची छेड काढल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या प्रकारामुळे महिला व तरुणींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. संबंधित 17 वर्षीय तरुणी नेहमीप्रमाणे गंगापूर रोड परिसरात मॉर्निंग रनिंगसाठी गेली होती. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या एका तरुणाने तिच्या जवळून जाताना मागून स्पर्श करत तिची छेड काढली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तरुणी घाबरली आणि परिसरात एकच खळबळ उडाली.
Nashik Crime News: तरुणीने सोशल मिडियावर सांगितली आपबिती
घटनेनंतर तरुणीने धाडस दाखवत सोशल मिडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये तिने तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगत महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि नागरिकांकडून संताप व्यक्त केला जाऊ लागला. प्रकरणाची गंभीर दखल घेत नाशिक पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला.
Nashik Crime News: तरुण मूळचा बिहार राज्यातील
परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित तरुणाचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. पोलीस तपासात हा तरुण मूळचा बिहार राज्यातील असल्याचे समोर आले असून तो सध्या नाशिकमध्ये कायद्याचे शिक्षण घेत असल्याची माहिती मिळाली आहे.
Nashik Crime News: महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह
या घटनेमुळे शहरातील महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. विशेषतः गंगापूर रोडसारख्या उच्चभ्रू आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या परिसरात अशी घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.