ऑफिसमधून टॅब चोरला, तब्बल 200 नको ‘ते’ व्हिडीओ, अन् पुढे…; खरातनंतर नाशिकमध्ये आणखी एक मोठं क
नाशिक क्राईम न्यूज : भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) याचे महिलांवरील अत्याचार आणि व्हायरल व्हिडिओचे प्रकरण अद्याप ताजे असतानाच, नाशिक शहरात आणखी एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. एका बड्या व्यावसायिकाच्या ऑफिसमधून टॅब चोरीला गेल्यानंतर, त्यातील सुमारे 200 वैयक्तिक आणि अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत 12 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. याप्रकरणी सातपूर पोलीस आणि क्राईम ब्रँचने सापळा रचून चार संशयितांना अटक केली आहे. (Nashik Crime News)
Nashik Crime News: नेमकं प्रकरण काय?
नाशिकच्या सातपूर परिसरातील एका व्यावसायिकाच्या ऑफिसमधून काही दिवसांपूर्वी एक टॅब चोरीला गेला होता. हा टॅब ज्यांच्या हाती लागला, त्यांनी त्यातील डेटा तपासला असता त्यांना धक्कादायक गोष्टी आढळल्या. टॅबमध्ये एका महिलेसोबतचे (मैत्रिणीचे) अनेक खासगी आणि आक्षेपार्ह व्हिडिओ होते. या व्हिडिओचा आधार घेऊन संशयितांनी संबंधित व्यावसायिकाला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. “12 लाख रुपये द्या, अन्यथा हे सर्व 200 व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करू,” अशी धमकी त्यांनी दिली.
Nashik Crime News: पोलिसांचा ‘सिनेस्टाईल’ पाठलाग आणि अटक
खंडणीच्या मागणीमुळे घाबरलेल्या व्यावसायिकाने पोलिसांत धाव घेतली. सातपूर पोलीस आणि गुन्हे शाखेच्या युनिट 2 ने तात्काळ सूत्रे हलवली. खंडणीच्या रकमेपैकी 10 हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना पोलिसांनी चार संशयितांना रंगेहाथ पकडले. यावेळी पोलिसांनी संशयितांचा ‘सिनेस्टाईल’ पाठलाग करून त्यांच्या मुसक्या आवळल्या. सध्या या चौघांचीही पोलीस कोठडीत कसून चौकशी सुरू आहे.
दरम्यान, या प्रकरणाला आता एक वेगळे वळण मिळाले आहे. एका टॅबमध्ये तब्बल 200 अश्लील व्हिडिओ असणे, ही बाब पोलिसांसाठी संशयास्पद ठरली आहे. हे व्हिडिओ नेमके कोणाचे आहेत? त्यातील महिला कोण आहेत? आणि हे व्हिडिओ संमतीने बनवले आहेत की फसवणूक करून? या प्रश्नांमुळं आता खुद्द तक्रारदार व्यावसायिकाकडेही पोलिसांच्या संशयाची सुई वळली आहे. या स्कँडलची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सातपूर पोलीस या प्रकरणाचा तांत्रिक तपास करत असून, लवकरच आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.