पत्नीची इन्स्टाग्रामवरील चॅट पाहताच रागाचा पारा चढला, सराईत गुंडाने बायकोच्या अंगावर थेट फॉर्च्
नाशिक क्राईम न्यूज : नाशिक शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या महापालिकेच्या राजीव गांधी भवन परिसरात काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. चारित्र्याच्या संशयावरून एका सराईत गुंडाने आपल्या 22 वर्षीय पत्नीला भररस्त्यात बेदम मारहाण करत, तिच्या अंगावर थेट ‘फॉर्च्यूनर’ कार घालून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या भयावह प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. (Nashik Crime News)
Nashik Crime News: नेमकी घटना काय?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोजमीन मुस्तफा शेख (वय 22) ही गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास पती समीर नासिर पठाण (रा. वडाळा गाव) याच्यासोबत आधार कार्डवरील नाव दुरुस्त करण्यासाठी महापालिकेच्या राजीव गांधी भवन येथील कार्यालयात आली होती. काम सुरू असतानाच समीरने रोजमीनचा मोबाईल हिसकावून घेतला. मोबाईलमधील ‘इंस्टाग्राम’वरील चॅट पाहिल्याने समीरचा रागाचा पारा चढला.
Nashik Crime News: भररस्त्यात केली मारहाण
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत समीरने तिला शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. त्यानंतर त्याने तिला बळजबरीने आपल्या फॉर्च्यूनर कारमध्ये (क्रमांक MH 16/7072) बसवले. चालत्या गाडीतही त्याने मारहाण सुरूच ठेवली. “तुला आज जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी देत समीर सीटच्या खालून काहीतरी हत्यार काढू लागला. यामुळे भयभीत झालेल्या रोजमीनने जीवाच्या आकांताने धावत्या गाडीतून उडी मारली आणि रस्त्यावरून पळू लागली.
Nashik Crime News: फॉर्च्यूनरने चिरडण्याचा प्रयत्न; सुदैवाने बचावली
पळून जाणाऱ्या पत्नीचा पाठलाग करत समीरने गर्दीची तमा न बाळगता “तुला आता गाडीखालीच मारतो,” असे ओरडत तिच्या अंगावर वेगाने कार घातली. सुदैवाने, गाडीचा जोरात धक्का लागून रोजमीन बाजूला फेकली गेल्याने तिचा जीव वाचला. मात्र, या धडकेत ती गंभीर जखमी झाली आहे. हा थरार पाहून आजूबाजूचे नागरिक धावून आल्याने संशयित समीर पठाण तिथून गाडीसह पसार झाला.
Nashik Crime News: सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल
या घटनेनंतर जखमी पत्नीने सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित समीर पठाण विरुद्ध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. समीर पठाण हा सराईत गुन्हेगार असून पोलीस आता त्याचा कसून शोध घेत आहेत. दिवसाढवळ्या नाशिकमध्ये घडलेल्या या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.